इन्फंट कान्व्हेंट येथे प्रवेशोत्सव : उत्साहवर्धक उपक्रमांद्वारे चिमुकल्यांचे स्वागत

 

लोकदर्शन👉 मोहन भारती

राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीसस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी उत्साहवर्धक अशा विविध उपक्रम व सर्जनशील कार्यक्रमाद्वारे प्री – प्राइमरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत प्रवेशोत्सवाद्वारे करण्यात आले. यात सर्व प्रथम विद्यार्थ्यांनी गीत, संगीत, नृत्य सादर करून सर्व मान्यवरांचे, नवप्रवेशित विद्यार्थी आणि पालकांचे स्वागत केले. शाळेचा पहिला दिवस, पहिली सुरूवात असल्याने मान्यवरांचे हस्ते तांदळावर प्रथम अक्षर लिहिण्याची प्रक्रिया घेण्यात आली. या वेळी सेल्फी पाईंट, मोटू – पतलू, डोरेमॉन, मिकी माऊस या कार्टून कॅरॅक्टरच्या वेशभूषा धारक विद्यार्थ्यांचे मन आकर्षून घेत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक अभिजीत धोटे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन माधुरी इरकी यांनी तर आभार प्रदर्शन नीतू सिंग यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here