आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) चे संचालक दिग्मार वॉल्टर यांनी दिली महाराष्ट्रातील पनवेल केंद्रास भेट.

 

*लोकदअर्शन👉विठ्ठल ममताबादे*

उरण दि 2जुलै
आय.एल.ओ. च्या माध्यमातून संपूर्ण भारतभर केंद्र सुरू करण्यात आले आहेत.महाराष्ट्रमध्ये प्रामुख्याने ठाणे व पनवेल येथे सदर ILo चे केंद्र सुरू आहेत. हिंद मजदूर सभा महाराष्ट्र कौन्सिलचे सरचिटणीस संजय वढावकर, कु श्रुती शाम म्हात्रे सदस्या हिंद मजदूर कौन्सिल हयांचे ठाणे व पनवेल येथील दोन्ही केंद्रात ILO चे कामकाज चालू आहे.पनवेल मधील खांदा कॉलनी येथील आगरी शिक्षण संस्थेत ILO चे कामकाज सुरू आहे. या केंद्रामार्फत घरेलू कामगार, इमारत व इतर बांधकाम कामगार, प्रधानमंत्री श्रम योजना व इतर असंघटित क्षेत्रातील कामगार यांना मदत व मार्गदर्शन सदर केंद्रामार्फत केले जात आहे. विशेषत: कोरोना-19 च्या काळात जे कामगार मृत्यू पावले तसेच जे कामगार कामापासून वंचित राहिले. ज्याचे कामधंदे बंद झाले अश्या व इतर असंघटित क्षेत्रातील कामगारांना ILO मार्फत मार्गदर्शन व मदत केली गेली. कार्यक्रमात उपस्थितांना संजय वढावकर यांनी थोडक्यात कार्यक्रमांचा सारांश व आ.एल.ओ. मार्फत चालू असलेल्या कामाचा माहिती व आढावा पाहुण्यांना करून दिला. तसेच उपस्थित मान्यवरांची ओळख कार्यक्रमांच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या संचालिका दिग्मार वॉल्टर यांना करून दिली.रायगडचे कामगार उपायुक्त प्रदिप पवार यांनी देखील दिग्मार वॉल्टर हयांच्याशी संवाद करून कामगारांच्या व ILO च्या कामाची माहिती दिली.खांदा कॉलनीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष कोकाटे यांनी देखील दिग्मार वॉल्टर हयांच्याशी कामगारांच्या प्रश्नाबाबत चर्चा केली.कार्यक्रमांचा शेवट कु. श्रुती शाम म्हात्रे सदस्या हिंद मजदूर सभा यांनी पी.पी.टी. व्दारे आजपर्यंत केलेल्या कामकाजाची माहिती सादर केली.सदस्यांची नोंदणी, विविध योजनाची चौकशी यांची संपूर्ण माहिती सादर केली. श्रुती म्हात्रे यांनी ILO चे कार्यलयीन प्रमुख एकनाथ ठोंबर व नयना आंबवणे तसेच कु. बेबी शेख हयांचे कौतूक केले. व पुढे हे कार्य सुरू ठेवायचे आहे असे आश्वासित केले .आगरी शिक्षण संस्थेने जागा उपलब्ध केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहे. ILO च्या संचालिका दिग्मार वॉल्टर यांच्या हस्ते आगरी शाळेतील विदयार्थ्याना चॉकलेटचे वाटप व शाळेच्या मैदानामध्ये वृक्षारोपण करून सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

सदर कार्यक्रमास विजय तळेकर तहसिलदार पनवेल, प्रदिप पवार कामगार उपायुक्त पनवेल रायगड,सुभाष कोकाटे वरिष्ठ पोलिस निरीक्षक खांदा कॉलनी पनवेल,शामकांत जोशी माजी कामगार उपायुक्त रायगड व इतर क्षेत्रातील मान्यवर या प्रसंगी कार्यक्रमास उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *