आयसीएमआर-हिमोग्लोबिनोपॅथी अनुसंधान प्रबंधन आणि नियंत्रण केंद्र*(ICMR-) च्या भव्य, सुंदर इमारतीला पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज जी अहीर यांनी भेट

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर

नोव्हेंबर 2019 मध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. या अतिशय सुंदर आणि भव्य इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले त्याची पाहणी केली. देशातील मंजूर 4 केंद्रांपैकी चंद्रपूर येथे पूर्ण झालेले हे पहिले केंद्र आहे. या ठिकाणी सिकलसेल, हिमोफिलिया व अन्य रक्ताच्या आजाराची तपासणी, उपचार तसेच या आजारांवर नियंत्रण व निर्मूलन यावर देशातील मोठ्या शास्त्रज्ञांमार्फत रिसर्च होणार आहे. मध्य भारतातील विशेषतः चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील तसेच छत्तीसगड , तेलंगणा व अनेक राज्यांना हे केंद्र उपयुक्त ठरेल असे अहीर यांनी सांगितले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *