एसटीचा वर्धापन दिन उरण बस आगारात उत्साहात साजरा

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 3जून उरण आगारात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा 74 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी उरण तालुक्यातील मान्यवर रायगडभूषण प्रा.एल.बी. पाटील सर व महादेव घरत- अध्यक्ष द्रोणागिरी स्पोर्ट्स क्लब यांच्या हस्ते आगारातील लालपरी बस क्र. MH14 BT 1416 चे पुजन करण्यात आले व उरण आगाराने 2021 या वर्षात इंधन बचत मोहिमेत मुंबई विभागात एकमेव विजेतेपद घेतले त्याबद्दल आगारातील चालकांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. व माहे जुन-2022 मध्ये आगारातील जेष्ठ चालक बि.बि.माने हे सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मान्यवर महादेवजी घरत यांनी उपस्थित कर्मचारी यांना लालपरीच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देऊन प्रबोधन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष एल.बि.पाटील यांनी उपस्थित कर्मचारी यांना लालपरीच्या वाढदिवसानिम्मित उत्कृष्ट शब्दात मार्गदर्शन करून लालपरीचे ग्रामीण भागातील महत्व पटवून दिले व एका कवितेद्वारे कामगारांना प्रबोधन केले.या प्रसंगी उरण आगार व्यवस्थापक सतीश मालचे, विभागीय कार्यालय मुंबई वाहतुक निरीक्षक रवी जाधव, वरिष्ठ लिपिक सिद्धेश रसाळ, अमोल पाटील, आगारातील सर्व यांत्रिक कर्मचारी, महिला कर्मचारी बोडके मॅडम, सुचिता मॅडम, कादंबरी मॅडम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिश्चंद्र भोईर यांनी केले. कार्यक्रमाची सजावट कलाकार संतोष गायकवाड, सचिन बोडके व महेश गोसावी यांनी केले. सर्वांच्या मेहनतीने, प्रयत्नाने एसटीचा वर्धापनदिन उरण बस आगारात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *