गडचांदुर नगरपरिषदच्या मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळकी यांच्या उचलबांगडीची मागणी हास्यास्पद! ÷भाजप नगरसेवक अरविंद डोहे यांचा सनसनाटी आरोप !

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर

♦️न.प.उपाध्यक्ष शरद जोगी यांचा श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न ?

गडचांदूर:-
डॉ.विशाखा शेळकी ह्या मागील चार वर्षापासून गडचांदूर येथील नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांच्याकडे राजूरा विधानसभा क्षेत्रातील कोरपना,जिवती,गोंडपिपरी नगरपंचायतचा सुद्धा अतिरिक्त पदभार आहे.एकापेक्षा जास्त ठिकाणचा पदभार असल्याचा फायदा घेत त्या कुठल्याही न.प.ला नियमित उपस्थित राहत नसून त्या नागपूर येथे आपल्या स्वघरी आरामात राहतात आणि वेळप्रसंगी केवळ ठेकेदारांचे बिल काढण्यासाठी येतात.नगरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून रात्रंदिवस एक करून बिल काढण्यात मात्र कुठलाही कसूर करीत नाही.असे असताना सत्ताधारी सुद्धा चकार शब्दही काढत नाही.याला कारण काही वेगळेच आहे.नगरपरिषदेला यांनी व्यवसाय बनविला असून ठेकेदारांना हे ग्राहक समजतात.असाच प्रकार या न.प.मध्ये सुरू असल्याचे दिसून येत आहे.ग्राहकांना संतुष्ठ ठेवण्यासाठी त्यांना दंडातून सूट दिल्या जात असून मात्र नागरिकाकडून थकलेल्या करावर दंड लावण्याचा निर्णय घेऊन जनतेची पिडवणूक करीत आहे.
बरेचशे नागरिक आपल्या समस्या घेऊन नगरपरिषदेत येतात मात्र याठिकाणी मुख्याधिकारी व नगराध्यक्षा उपस्थित राहत नसल्याची बोंब शहरात पसरत आहे.”कागदावर वजन नसेल तर कागद उडून जातात” अशीच स्थिती या नगरपरिषदेची बनल्याचे आरोप होत आहे.अधिकारी गायब असल्याने काही कर्मचारी सुद्धा जास्त वेळ न.प.कार्यालयात हजर राहत नाही.शेवटी आपली समस्या घेऊन नागरिकांनी जायचे तरी कुठे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.नगरपरिषदेची थकबाकी वाढली,सामान्य फंडाची आर्थिक स्थिती ढासळली आहे.त्यामुळे मागील 12 महिन्यांपासून सफाई कामगारांचे पगार थकले आहे.कर्मचाऱ्यांचे कामावर लक्ष नसल्याने शहरात स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.याला संपूर्णपणे सत्ताधारी व मुख्याधिकारीच दोषी असल्याचे ठाम मत विरोधी नगरसेवक अरविंद डोहे यांनी व्यक्त केले आहे.
मुख्याधिकारी कार्यालयात हजर राहत नाही,नागरिकांच्या समस्या सोडवीत नाही,नागरिक,डॉक्टर,पत्रकार,व्यापारी तसेच लोकप्रतिनिधीं सोबत गैरवर्तणूक करतात,सभागृहात दादागिरी सारखी वागणूक दाखवतात,सभागृहाला खोटी माहिती पुरवितात,सभागृहात अधिकार नसताना एखाद्या सदस्याप्रमाणे भाग घेतात,लोकप्रतिनिधींना गैरवर्तणुकीची वागणूक देतात,परंतू सत्ताधारी यावर एक शब्दही बोलत नाही.सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळेच अखेर नगरपरिषदेवर सीईओं चाच दबदबा आहे,हे नाकारता येत नाही.मुख्याधिकारी यांना 4 वर्षे पूर्ण झाले आहे,त्यांची शासकीय बदली होणारच आहे.मुख्याधिकारी यांना प्रत्येक्ष कुठलाही जॉब विचारण्याची हिम्मत नाही.मुख्याधिकारी विरुद्ध विषय सूचित,विषय घेऊन कारवाई किंवा बदलीचा ठराव घेऊ शकत नाही.परंतु राष्ट्रवादीच्या नेत्यांना घेऊन न.प.उपाध्यक्ष शरद जोगी व इतर राष्ट्रवादी कांग्रेसचे नगरसेवक मात्र मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळकी यांची बदली करण्याची गुप्तपणे तक्रार मंत्री महोदयांकडे करून यांच्या उचलबांगडीची मागणी करतात अशा बातम्या विवीध वृत्तपत्रात प्रकाशित करतात,हे कितपत योग्य आहे. हे निव्वळ येणाऱ्या अधिकाऱ्यांवर वचक निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न तर नाही ना ? असा सवाल विरोधी नगरसेवक डोहे यांनी केला आहे.आता मुख्याधिकाऱ्याची बदली होतील का ? जरी न झाल्यास येणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या विषय सुचित विषय घेऊन मुख्याधिकारी विरुद्ध कार्यवाई बाबतचा ठराव घेऊन शासनाकडे पाठपुरावा करतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्याधिकाऱ्यांची बदली होणारच असून हे आम्ही केले असल्याचे श्रेय लाटण्याचा केविलवाना प्रयत्न आहे.अशी चर्चा संपूर्ण शहरात ठिकठिकाणी सुरू आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *