महिलांनी आपल्या पोटाला चिमटा घेत मुले उच्चशिक्षित करावी-रघुनाथ ढोक

लोकदर्शन 👉 राहुल खरात

सुशीलाबेन तर्फे 68 महिलां tuना साड्या वाटप

वाई-सुशीलबेन मोतीलाल शाह चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे दि.28 मे 22 रोजी दुपारी 12 वाजता यशवंतनगर ,वाई मधील सोनजाई नगर समाजमंदिरात मातंग समाजातील अत्यन्त गरीब 68 महिलांना व मुलाना साड्या व फळे जेष्ठ समाजसेवक मोतीलाल व शुशीलबेन शाह तसेच फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन चे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते वाटप करण्यात आले.
या मान्यवरांचे सत्कार सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच आनंदा साठे तसेच आयोजक राष्ट्रीय अपंग विकास महासंघ सातारा जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. भाग्यश्री काळभोर यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी सत्यशोधक ढोक म्हणाले की काळभोर मंडम ने माहिती दिल्याने खास पुण्यावरून येऊन शाह परिवाराने आपल्या गरजू महिलांना साड्या व फळे वाटप केली तर आपणही लाभ घेऊन हे व इतर मान्यवर कसे मदत करतील या दृष्टीने आपण आदर्श निर्माण करावा.आपण पोटाला चिमटा घ्या पण आपली मुले उच्चशिक्षित करा,त्यांचे मध्ये परिस्थिती ची जाणीव करुन जिद्दीने अभ्यास करून मोठे करा तरच आपली परिस्थिती बदलेल.ढोक पुढे म्हणाले की आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे ,वाईट संगत नाही ना हे पाहणे तसेच शहरात मुले शिक्षण घेण्यासाठी पाटविल्यावर जागरूक राहून सतत माहिती घेणे ही काळाची गरज आहे.
मोतीलाल शाह म्हणाले की काळभोर मंडम अपंग साठी काम करतात हे माहिती होते पण इतर गरजु लोकांना मदत मिळाली पाहिजे हे देखील त्यांनी आज काम केले. आज आमचे मित्र ढोक व काळभोर मंडम सारखे सामाजिक कार्यकर्ते आपल्यात निर्माण होण्याची गरज आहे असे देखील म्हंटले.
यावेळी ढोक यांनी अनेक झोपड्या ना भेट देऊन लोक कसे हलाकीत जीवन जगतात याची पाहणी व त्याच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या ,अनेक कटुंब एकाच खोलीत कसे जीबन जगतात हे पाहिले मुळे त्यांनी पुन्हा इतर मदत मिळवून देणार असे त्यांना म्हटले.
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक भाग्यश्री काळभोर मंडम तर आभार प्रदर्शन मनोज शाह यांनी मानले तर मोलाची मदत सौ.रुपाली वायदंडे ,राजश्री साठे,ऋत्विक साठे यांनी केली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *