प्रेरणा फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.दिप्ती(प्रेरणा)वैभव गावकर-कुलकर्णी भारत गौरव राष्ट्रप्रेरणा पुरस्काराने सन्मानित

लोकदर्शन बदलापूर.👉गुरुनाथ तिरपणकर

लेक लाडकी अभिमान महाराष्ट्र राज्य आयोजित भारत गौरव राष्ट्रप्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा २०२४नुकताच मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणा-या समाजसेविका आकांत नाटकाच्या लेखिका-दिग्दर्शिका,अभिनेत्री,पत्रकार तसेच प्रेरणा फाऊंडेशनच्या संस्थापिका-अध्यक्षा सौ.दिप्ती(प्रेरणा)गावकर-कुलकर्णी मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते भारत गौरव राष्ट्रप्रेरणा पुरस्कार२०२४ने सन्मानित करण्यात आले.दिप्ती(प्रेरणा)गावकर-कुलकर्णी यांनी प्रेरणा फाऊंडेशनच्या माध्यमातून गेली सहा वर्षे सांस्कृतिक,शैक्षणिक.सामाजिक,संगणकीय क्षेत्र,वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य कले आहे.कोरोना काळातही दिप्ती(प्रेरणा)गावकर यांनी विशेष अतुलनीय असे कार्य केले आहे.आताही प्रेरणा गावकर-कुलकर्णी या प्रेरणा फाऊंडेशनच्या सहाव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून वांगणी येथील स्पेशल चाईल्ड किनारा रेसिडेंशियल मतिमंद स्कुल साठी व साईशा योगेश परब या मतिमंद मुलीच्या उपचारासाठी प्रेरणा रंगमंच नाट्य मंडळ निर्मित”आकांत”या नाटकाचा शो आचार्य प्र.के.अत्रे नाट्यमंदीर येथे शनिवार दि.४मे रोजी सकाळी ११वाजता आयोजित केला आहे.नाट्य प्रयोगासाठी ९३७०८००८४२/८४५१९४८९९८या नंबरवर संपर्क साधावा,असे आवाहन प्रेरणा फाऊंडेशनचे सचिव वैभव कुलकर्णी यांनी केले आहे.प्रेरणा गावकर-कुलकर्णी या अशाच नेहमी समाजकार्यात कार्यरत असतात.त्यांना भारत गौरव राष्ट्रप्रेरणा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *