राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित

लोकदर्शन 👉 मोहन भारती                         नागपुर÷*राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त अवयव दान आणि नेत्र दानाचे आव्हान व मार्गदर्शन करणार सौ वंदना विनोद बरडे सामाजिक कार्यकर्त्या नागपूर सोबत भव्य बाईक रॅलीचे आयोजन . आपला इतिहास आहे कि पूण्यश्लोक अहील्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या वेषभुषा , गाणें , कविता , पोवाडे ,गेम स्पर्धा असा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे सर्वत्र असे उपक्रम राबवून जनजागृती , जनजागरण , रॅली काढून मातेची जयंती उत्साहात साजरी करण्यात यावी मातेच्या ईतीहास जगासमोर यावा व तरुण पिढीला ती शिकवण देवून भावी पिढी घडवावी.मातेची शिकवण लक्षात घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे .मातेचा ईतीहास बघीतला असता अनेक गुण , शिकवण घेण्यासारखी आहे.त्यांचे संस्कार , देशाप्रती प्रेम भावना , कल्याणकारी व्रुत्ती , रयतेचा साठी झटणे , कोणावर ही अन्याय होणार नाही हे बघणे.कर्तव्यदक्ष , आदर्श व्यक्तिमत्व होत मातेच .गेली २९ वर्ष राज्य केलं मातेने.तेही आदर्श निर्माण करुन दिला जगासमोर.सर्व आदर्श व्यक्ति मध्ये मातेच अग्रक्रमावर आहे.आज कीति बिकट परिस्थिती आहे.अस वाटतं मातेने पुन्हा जन्म घ्यावा या धर्तीवर.कारण त्यांच राजकारण , समाजकारण , समाजकार्य ,आता कुठ आहे.ज्या मातेने आपल्या पोटच्या पोराला सुध्दा शिक्षा केली होती.आता ती परीस्थिती नाही तो आदर्श नाही.आता उलट दोषींना शिक्षा होत नाही तर बगल दिली जाते.तेव्हा आठवण येते माते तुम्ही यावे.या नराधमांना शिक्षा द्यावी.काळिज पिळून निघत अशा घटना घडत आहेत.मी सौ वंदना विनोद बरडे सामाजिक कार्यकर्त्या नागपूर अशी आक्रोशाची विनंती करते.आपण हा इतिहास वाचावा व तो सर्वत्र दरवळावा . आणि आज ती काळाची गरज आहे.आज अशे कितीतरी लोकांना अवयव दानाची गरज आहे.नेत्राची गरज आहे.आपण हे शरीर असेच टाकून जाणार आणि समाज आपले क्रियाकरम करणार ,हे शरीर नशवर आहे.हा आपला समज होता.आता मातेच्या कल्याणकारी राजवटीचे काम बघून आदर्श घेऊन आपणं आपलं शरीर दान करायला पाहिजे.मेल्यानंतर हे शरीर जाळल्या जाईल.तर मरतामरता पुण्य करुन जायचे असेल तर अवयव दान नेत्र दान करून पूण्य कमवा व त्या रुपाने जगात जिवंत रहा.मेल्यावरही मी कोणाच्या तरी कामी पडलो.याच समाधान बाळगा. या वर्षी कोरोना नसल्याने जरा उसंत मिळाली व नविन विचार , घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती महीला मंडळी यांनी जय्यत तयारी केली आहे.सौ वंदना विनोद बरडे सामाजिक कार्यकर्त्या नागपूर ह्या स्वतः अहील्यादेविची वेषभूषा करून घोड्यावर स्वार होऊन येत आहे आपल्याला भेटायला आणि जनजागरण जनजागृती करायला व सोबत पिवळ्या रंगाची लुगडी नेसून , फेटे बांधून महीला भगीनी सर्व समाज बांधव व भगीनी लहान मोठे स पिवळ्या रंगाचे झेंडे घेवून राॅलित सहभागी होणार आहेत.विषेश आकर्षक लेझीम महीला भगीनि पथक असणार आहे.दिनांक ३१ मे २०२२ ला आपण सर्वांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे .राॅली संपल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सौ वंदना विनोद बरडे सामाजिक कार्यकर्त्या नागपूर व महिला मंडळ यांनी केले आहे.

नव्या विचारांचे प्रेरक बना सौ वंदना विनोद बरडे नागपूर सामाजिक कार्यकर्त्या

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *