कढोली खुर्द सेवा सहकारी संस्थेवर पुन्हा काँगेसची बाजी

By : Shankar Tadas
लोकदर्शन👉
कोरपना : तालुक्यातील अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या कढोली खुर्द सेवा सहकारी संस्थेवर पुन्हा काँगेसप्रणित महाविकास शेतकरी सहकार आघाडीने बाजी मारत आपले 13 पैकी 13 उमेदवार विजयी केले आहेत. शेतकरी संघटना, भाजपा आणि गोंगपा एकत्र येऊनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
सर्वसाधारण कर्जदार खातेदार गटातून शुभम दिवाकर आस्वले, रमेश पत्रु कुंभारे, रामदास कवडू चिंचोलकर, किसन देवराव टोंगे, हरिश्चन्द्र जनार्दन पिंपळकर, विजय नानाजी बोन्डे, अनिल विठ्ठल मुसळे, रामचंद्र जागोबा वऱ्हाटे विजयी झाले. महिला राखीव गटातून सिंधू जगन्नाथ दरेकर, सुरेखा सुधाकर हेकाड, SC/ST गटातून गोसाई चिंतामण वानखेडे, OBC गटातून मधुकर लटारी वडस्कर आणि भटक्या जमाती गटातून सुनील हरी दरेकर या एकूण 13 विजयी उमेदवारांचा समावेश आहे.
एकूण 310 मतदारांपैकी 304 जणांनी मतदान केले. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व काँग्रेसचे नेते विजयराव बावणे, तसेच सुरेशजी मालेकर यांनी प्रत्यक्ष मतदाराकडे जाऊन भेट घेतली. यापूर्वी दहा सेवा संस्था ताब्यात आल्याने काँगेसकरिता कढोली खुर्द येथील निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरली होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *