महिलांनी आपले संविधानिक अधिकार वापरून प्रगती साधावी* — नगराध्यक्ष अरुण धोटे.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

*⭕शिवाजी वार्ड, राजुरा येथे महिला दिन उत्साहात संपन्न*

राजुरा (ता.प्र) :- शिवाजी वार्ड, साईनगर वार्ड, रमानगर वार्ड, महात्मा फुले वार्ड यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी शाळेचे पटांगण, शिवाजी वार्ड, राजुरा येथे जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, उद्घाटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव नम्रता ठेमस्कर, राजुरा काँग्रेसच्या शहराध्यक्षा संध्याताई चांदेकर, माजी नगरसेवक हरजितसिंग संधू, वज्रमाला बतकमवार आदि मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष अरुण धोटे म्हणाले की भारतीय संविधानात महिलांना व्यापक अधिकार प्रदान करण्यात आले असून महिलांनी आपले संविधानिक अधिकार जानून आपल्या आणि समाजाच्या हितासाठी सातत्याने यशसंपादन करावे, प्रगती साधावी असे मत व्यक्त केले. तर प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव नम्रता ठेमस्कर यांनी सांगितले की महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून त्या देखील उत्तम कामगिरी करून प्रगती साधत आहेत. त्यामुळे महिलांनी आपला आत्मसन्मान कायम ठेऊन जग जिंकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला ज्योती झाडे, वनिता इनमुलवार, विजया चिंचोलकर, अर्चना देवगडे, वर्षा वरकडे, लता वाघमारे, शारदा जगताप, श्रेया पडसपगार, शुभांगी खामनकर, अनघा संधू यासह आयोजक वार्डातील अनेक महिला उपस्थित होत्या.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *