शाळा न्यायाधिकरण चंद्रपूर येथेच ठेवण्याची विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेची मागणी सुधाकर अडबाले सरकार्यवाह।                 

लोकदर्शन 👉 मोहन भारती✨
हा
चंद्रपूर (का.प्र.) चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली येथील खाजगी माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याला संस्थेकडून बेकायदेशिर व नियमबाहय सेवामुक्त,बडतर्फ,पदावन्नत सेवाज्येष्ठतेचा वाद व सेवा ज्येष्ठता डावलून पदोन्नती दिली असेल तर अश्या प्रकारच्या अन्यायाविरोधात शाळा न्यायाधिकरणाकडे दाद मागण्याची तरतूद महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती ) अधिनियम १९७७,नियमावली १९८१मध्ये दिलेली आहे.
सन 1998 पासून चंद्रपूर येथे सूरू असलेल्या शाळा न्यायाधीकरण मध्ये चंद्रपूर,वर्धा व गडचिरोली जिल्हयाचा समावेश होता. दि.20 मे 2022 नुसार शाळा न्यायाधिकरण पुनर्रचना शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मंत्रालय,मुंबई यांनी अधिसुचना प्रसिध्द करून चंद्रपूर येथील शाळा न्यायाधिकरण कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला असल्यामूळे आता कर्मचाऱ्यावर झालेल्या अन्यायाला दाद मागण्यासाठी चंद्रपूर गडचिरोली व वर्धा जिल्हयातील कर्मचाऱ्याना नागपूरला जावे लागणार आहे. त्यामूळे शिक्षण क्षेत्रात कमालीचा असंतोष पसरला आहे.
शाळा न्यायाधिकरणात दिवसेंदिवस कर्मचाऱ्यांच्या समस्याची संख्या वाढत आहे. अनेकदा पिठासीन अधिकार्यानची पदे रिक्त असतात.त्यामूळे न्याय मिळण्यासाठी बराच कालावधी जातो.प्रकरणे प्रलंबित राहतात त्यामूळे कर्मचाऱ्यांना न्याय मिळेपर्यंत वर्षानुवर्षे न्यायालयाच्या चकरा माराव्या लागते गडचिरोली जिल्हयातील सिरोंचा,एटापल्ली,भामरागड व चंद्रपूर जिल्हयातील राजूरा,कोरपना,जिवती या नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागातून नागपूर सारख्या ठिकाणी वारंवार जाण्यायेण्यात मानसिक त्रास,वेळ आणि पैशाचा भुंर्दड सोसावा लागणार आहे.
सदर निर्णयाचा फेरविचार करून चंद्रपूर,वर्धा,गडचिरोली जिल्हयातील अस्तित्वात असलेले शाळा न्यायाधिकरण कायम ठेवावे.शिक्षक-शिक्षकेत्तर कर्म चाऱ्यांच्या न्याय मागणीचे निवेदन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे प्रांतीय अध्यक्ष श्रावण जी बरडे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री व अव्वर मुख्य सचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांचेकडे सादर केलेले आहे. तसेच न्यायाधिकरण चंद्रपूर ला कायम ठेवण्यात यावे यासाठी जिल्हयाचे पालकमंत्री ना.विजयभाऊ वडेट्टीवार,मा.खासदार बाळूभाऊ धानोकर, माजी अर्थमंत्री मा.आमदार सुधिरभाऊ मुनगंटीवार, मा.आमदार सुभाषभाऊ धोटे, मा.आमदार मितेशजी भांगडीया, मा.आमदार प्रतिभाताई धानोरकर, मा.आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांना पत्राव्दारे विनंती केली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *