रस्त्यावरील अतिक्रमणामुळे कळंबुसरे गावात गेला जितेश ठाकूर या निष्पाप तरुणाचा बळी

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

⭕बेकायदेशीर व अनिधिकृत बांधकाम हटविण्याची मागणी.

उरण दि 18 उरण तालुक्यातील चिरनेर कोप्रोली मार्गावरील कळंबुसरे गावाजवळ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्यावर अनेकांनी अनधिकृत बांधकामे करून अतिक्रमण चालू केले आहेत. त्यामुळे अपघाताचा आणि वाहतुक कोंडीचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना, प्रवाशी वर्गांना, वाहन चालकांना सहन करावा लागत आहे.कळंबुसरे गावाजवळील मिर्ची गोदामाजावळ तर त्याच्या बाजूला रस्त्यावर 8 ते 10 फुट अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले आहे. आता तर या बांधकामाच्या बाजूला दगडाचा बांध तयार केला आहे. या अतिक्रमणामुळेच मंगळवार दिनांक 17 मे 2022 रोजी उरण तालुक्यातील खोपटे बांधपाडा गावातील जितेश जगन्नाथ ठाकूर या 24 वय वर्ष असलेल्या युवकाचा निष्पाप बळी गेला आहे. सदर युवक कामावरून घरी जात असताना येणाऱ्या वाहनाला बाजू देत असताना दगडांना धडक लागून गोदामाच्या भिंतीला डोके आपटून युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही अतिक्रमणे हटविण्यात यावी अशी वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देत नसल्याने या अतिक्रमणांना बांधकाम विभागाचे अभय असल्याचे बोलले जात आहे. सदर घटनेला जबाबदार कोण ? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.कळंबूसरे बस स्टॉप व मिर्ची गोदामा जवळील व मुख्य रस्त्यावरील अनिधिकृत, बेकायदेशीर बांधकाम हटविण्यात यावेत.शिवाय रस्त्यावर दोन्ही बाजूनी वाहने उभे असतात त्यामुळे अपघात होतात तेंव्हा अशी दोन्ही बाजूनी वाहने रस्त्यावर उभे करू नयेत अशी मागणी खोपटे गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा चिरनेर पंचायत गण अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *