लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,
दी आदित्य बिर्ला पब्लिक स्कुल, गडचांदूर येथे उन्हाळी शिबिराला उत्साहात प्रारंभ झाला,4 मे ला सुरु झालेल्या शिबिराचा समारोप 14 मे ला होणार आहेत.
या शिबिरात वर्ग 1 ते 5 चे एकूण 240 विद्यार्थी सहभागी झाले आहेत,
विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा या मुख्य उद्देशाने या शिबिरात विविध प्रकारच्या स्पर्धा, क्रिडा स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहेत.प्राचार्या अर्चना गोलचा यांच्या कुशल मार्गदर्शनाखालीV या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत,शाळा व्यवस्थापन समिती च्या अधिकाऱ्यांनी या शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.