खिर्डी आदिवासी सोसायटीवर काँग्रेसचे १३ पैकी ११ उमेदवार बिनविरोध

By : Shankar Tadas
लोकदर्शन👉

कोरपना – तालुक्यातील खिर्डी आदिवासी सोसायटीवर काँग्रेसचे १३ पैकी ११ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे.
आमदार सुभाष धोटे व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शेखर धोटे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविण्यात आली होती. काँग्रेस विरुद्ध शेतकरी संघटना अशी लढत होणार होती. मात्र काँग्रेसच्या ६ उमेदवारांच्या विरोधात विरोधकांचा अर्ज नसल्याने ६ उमेदवारांची पूर्वीच अविरोध निवड झाली. उर्वरित ७ जागांसाठी काँग्रेस व शेतकरी संघटनेने विविध गटातून नामांकन अर्ज भरले.
५ मे रोजी नामनिर्देशन वापस घेण्याची तारीख होती. शेतकरी संघटनेने ५ तर काँग्रेसने २ अर्ज मागे घेतल्याने निवडणूक अविरोध पार पडली. बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांमध्ये काँग्रेसचे रामचंद्र कुळमेथे, राजेंद्र मडावी, पद्माकर मडावी, भीमा सिडाम, बापूजी सलाम, अशोक आस्कर, सुरेश राऊत, कमलाकर देरकर, गुलाब जीवतोडे, मंगला पंधरे, मंगला येरमे तर शेतकरी संघटनेचे सुभाष कोडापे, उद्धव लिपटे यांचा समावेश आहे. सोसायटीचे माजी अध्यक्ष अशोक कुडमेथे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *