MGM हॉस्पिटल वाशी येथे अंतिम बिलामध्ये रुग्णांना 15 % टक्के सूट. मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश

लोकदर्शन 👉 (विठ्ठल ममताबादे )

उरण दि 8 गरिबांना दिवसेंदिवस जगणे कठीण झाले आहे. महागाईने तर सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले आहे.अशातच गोरगरीब व गरजू रुग्णांकरिता अंतिम बिलात सवलत मिळावी यासाठी मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश आले असून प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल पाटेकर यांनी केलेल्या पत्रव्यवहाराला सकारात्मक प्रतिसाद देत MGM हॉस्पिटल वाशी नवी मुंबई उरण मधील गरीब व गरजू लोकांसाठी अंतिम बिलात 15% सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

अंतिम बिलात 15% सूट देण्यात येईल असे अधिकृत पत्र विशाल पाटेकर यांना प्राप्त झाले असून याचा फायदा समाजातील दुर्बल घटका पर्यंत पोहोचणार आहे. मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण या संस्थेने केलेल्या पाठपुराव्यामुळेच हे शक्य झाल्याने उरण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार महेश बालदी यांनी मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान च्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *