भारत विर्च्युल युनिव्हर्सिटी तर्फे मानद डॉक्टरेट (Hon. Ph.D) स्वीकारतांना डॉक्टर प्रवीण निचत

लोकदर्शन दिल्ली प्रतिनिधी👉 राहूल खरात

भारत वर्चुअल युनिव्हर्सिटी फॉर पीस अँड एडुकेशन तर्फे मानद डॉक्टरेट (हॉनररी डॉक्टरेट ,पी एच डी) प्रदान सोहळा टेकनिया ऑडिटोरियम, रोहिणी, पितंपुरा, नवी दिल्ली येथे संपन्न झाला. ह्या वेळी डॉक्टर टी एम स्वामी फाउंडर अँड डीन भारत विर्च्युल युनिव्हर्सिटी , डॉक्टर राजेश कुमार तोमर डायरेक्टर मेवार युनिव्हर्सिटी , नॅशनल वाईस प्रेसिडेंट राष्ट्र निर्माण पार्टी प्रो चान्सलर विराट स्किल्स अँड लोटस स्किल्स युनिव्हर्सिटी मणिपूर, मा. खासदार कुमार पाल मेहता (भारतीय जनता पार्टी ) जे पी नड्डा (भारतीय जनता पार्टी प्रेसिडेंट ) ह्यांचे जवळचे संबंधी, डॉ. नीरज गुप्ता, बी जे पी एम सिडी कौंसिलर, एम. एम . अहमद, डॉक्टर चंद्रकांत सिंग, मेजर जनरल राणा, सुरज मंडळ, डॉक्टर प्रियांका चौहान, माँ प्रभा किरण स्पिरिच्युअल लीडर, उत्तराखंड, सुभाष गुप्ता, नरेश गोयल, गौरव गुप्ता, असे दिग्गज मान्यवर च्या उपस्तिथीत उत्साहात पार पडला. मान्यवरांच्या उपस्तिथीत मुंबई चे सुप्रसिद्ध निसर्गउपचार तज्ज्ञ व ऍक्युपंक्चरिस्ट डॉक्टर प्रवीण निचत, ह्यांना (आयुर्वेद /प्राकुर्तीक चिकित्सा/ पूरक आणि पर्यायी औषध), व अश्या विविध आपापल्या क्षेत्रात निपुण असलेल्या व्यक्तींना मानद डॉक्टरेट (हॉनररी डॉक्टरेट पी एच डी) प्रदान करण्यात आली आहे.

डॉक्टर प्रवीण निचत हे पत्रकार तर आहेच परंतु आरोग्य क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. ते निसर्गउपचार तज्ज्ञ व ऍक्युपंक्चरिस्ट असून गेल्या २ दशकांपासून रुग्णांची सेवा करत आहे. ते टेलीफोनद्वारे रुग्णांना घरघुती इलाज सांगून रुग्णांची काळजी घेऊन बरे करतात, ह्याचे ते एकही रुपया कुणाकडून घेत नाही संपूर्णपणे निसस्वार्थ समाज सेवा करत आहेत. ह्या उपक्रमातून त्यांनी जवळ पास २ लाखांच्या वर रुग्णांना बरे केले आहे ज्यांना त्यांनी पहिले देखील नाही. नुकताच त्यांचा सन्मान माननीय राज्यपाल श्री. भागतसिंग कोशायरी जी यांच्या हस्ते करण्यात आला, त्याआधी उत्तराखंडचे राज्यपाल, माननीय लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग जी, मिझोरामचे राज्यपाल महामहिम श्री अमलोक रतन कोहली जी यांनीही त्यांचा सन्मान केला आहे. आरोग्य क्षेत्रात विविध १७५ राष्ट्रीय तथा आंतराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित डॉक्टर प्रवीण निचत ह्यांच्या नावाची व कार्याची नवीन ओळख करून द्यायची गरज नाही. आरोग्य क्षेत्रात नैसर्गिक उपचार, पूरक औषधी, व आपल्या अवती भवती आढळण्याऱ्या वनस्पतीचा, पंचगव्यचा, दोरी चिकित्सा, वूड थेरपी, फिश थेरपी, वॉटर थेरपी, मसाज थेरपी, असे नैसर्गिक उपचारांचा वापर करून विविध आजारांवर उपचार करून भारतातील विविध भागातील साध्य व असाध्य रोग्यांवर उपचार करून त्यांना व्याधी मुक्त केल्या बद्दल भारत वर्चुअल युनिव्हर्सिटी फॉर पीस अँड एडुकेशन तर्फे मानद डॉक्टरेट (हॉनररी डॉक्टरेट पी एच डी) प्रदान करण्यात आली आहे.
मानद डॉक्टरेट (हॉनररी डॉक्टरेट) स्वीकारतांना आपल्या देशाच्या प्रति आमची जबाबदारी वाढली व आम्ही सातत्याने ह्या क्षेत्रात आणखी संशोधन करून रोगमुक्त भारत करण्याचा प्रयत्न करू, तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहोत असे उद्गार ह्या प्रसंगी त्यांनी काढले. त्यांनी ह्या मानद डॉक्टरेट पदवीबद्दल भारत वर्चुअल युनिव्हर्सिटी फॉर पीस अँड एडुकेशनचे आभार मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *