भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने शक्तीकेंद्र प्रमुख व बुथ प्रमुख संपर्क अभियानास प्रारंभ

लोकदर्शन 👉 मोहन भारती


शक्ती केंद्र प्रमुख व बुथ प्रमुखांनी आप आपले बुथ मजबूत करा असे आवाहन

⭕श्री खुशाल भाऊ बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर यांनी केले

कोरपना तालुक्यातील कोरपना नगर पंचायत व येरगव्हान – परसोडा जिल्हा परिषद श्रेत्रातिल शक्ति केंद्र प्रमुख व बुथ प्रमुखांच्या बैठकिच्या अध्यक्ष स्थानी श्री खुशाल भाऊ बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर तथा प्रदेश सदस्य प्रमुख उपस्थिती श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष, श्री राजुभाऊ घरोटे किसन आघाडी जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, श्री अमोल आसेकर माझी नगरसेवक,श्री अनिल कौरासे शाखा अध्यक्ष कोरपना, श्री नारायण कोल्हे, श्री वासुदेव आवारी,श्री पद्माकर दगडी,साजिद उमरे युवा मोर्चा कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते कोरपना, कन्हाळगाव,रुपापेठ येथील शक्ती केंद्र प्रमुख व बुथ प्रमुखांची बैठका घेऊन शक्ती केंद्र प्रमुख व बुथ प्रमुख यांची जबाबदारी या बद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले व शक्ती केंद्र प्रमुख व बुथ प्रमुख यांनी आप आपली जबाबदारी समजून बुथ मजबूत करावे असे आवाहन केले इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले बैठकीला मनोज तुमराम शक्ती केंद्र प्रमुख,राजु येरेकर बुथ प्रमुख, दिवाकर गेडाम, सुधाकर कव्वलवार यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाला शक्ती केंद्र प्रमुख,बुथ प्रमुख, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन अनिल कौरासे यांनी केले तर आभार साजिद उमरे यांनी मानले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *