श्री छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड व महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने गुलाब देऊन रमजान ईदच्या दिल्या शुभेच्या ( कारमपुरी (महाराज) यांनी दिला विश्वबंधुत्वाचा नारा ).

*लोकदर्शन 👉 मोहन भारती

*सोलापूर दिनांक :- ०३/०५/२०२२ :-* पवित्र रमजान सणानिमित्त नमाज पठणानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड व शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने किडवाई चौक येथील मर्कट मशीदीसमोर नमाज पठणानंतर सर्व नमाजी मुस्लिम बांधवांना गुलाब फुल देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
श्री छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड व शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने किडवाई चौक येथील मर्कट मशीदीसमोर सकाळी ८ वाजता नमाज पठणानंतर सर्व नमाजी मुस्लिम बांधवांवर गुलाब कळ्यांचा वर्षाव करण्यात आला. आणि सर्व बांधवांना गुलाब फुल देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.
सदर प्रसंगी महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज), अध्यक्ष दशरथ नंदाल, ॲड. मुनिनाथ कारमपुरी, गुरूनाथ कोळी, गणेश म्हंता, श्री छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे ॲड. फारुक शेख, अयाज दिना (मेंबर) यांच्यासह हिंदु मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. *➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *————*फोटो मॅटर :- रमजान ईद निमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड व शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने ईद निमित्त नमाजी मुस्लिम बांधवांना गुलाब देऊन शुभेच्छा देतांना विष्णु कारमपुरी (महाराज), फारुक शेख, अयाज दिना (मेंबर), दशरथ नंदाल, ॲड. मुनिनाथ कारमपुरी आदि दिसत आहेत.*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *