टेकामांडवा आणि पाटण येथे काँग्रेस कार्यकर्ता बैठक.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

⭕आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत अनेकांचे काँग्रेसमध्ये प्रवेश.

जिवती (ता.प्र) :– लोकप्रिय खासदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली जिवती तालुक्यातील टेकामांडवा आणि पाटण येथे काँग्रेस कार्यकर्ता बैठक घेण्यात आली. या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. स्थानिक पातळीवर एकजुटीने व निष्ठेने काम करून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नरत राहण्याचे आवाहन केले. परिसरातील मुलभूत समस्या सोडविण्यासाठी आपण वरिष्ठ पातळीवर सातत्याने पाठपुरावा करून विविध विकासकामे मार्गी लावीत असून येणाऱ्या काळात विविध विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे असे मत व्यक्त केले. या प्रसंगी अनेक स्थानिक कार्यकर्त्यांनी काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश केला. आमदार सुभाष धोटे यांनी काँगेस पक्षाचे दुप्पटे देवून त्यांचे काँगेस पक्षात स्वागत केले. यात कोमलताई सोडनार, कमलाबाई कांबळे, कमलाबाई पल्लेवाड, सरुबाई गायकवाड यासह अनेकांनी पक्ष प्रवेश केला.
या प्रसंगी काँग्रेसचे जिवती तालुकाध्यक्ष गणपत आडे, सं गां नि योजनेचे अध्यक्ष कैलाश राठोड,माजी सभापती अंजना पवार, माजी सभापती सुग्रीव गोतावळे, माजी उपनराध्यक्ष अश्फाक शेख, युवक काँग्रेसचे महासचिव बालाजी गोटमवार, देविदास साबणे, भीमराव पवार, बंडू राठोड, ताजुद्दिन शेख, तालुकाध्यक्ष महिला ओबीसी विभाग किरण पांचाळ, माधव डोईफोडे, गणपत देवकते, सिताराम मडावी, गोविंदराव सुरणार, शिवाजी कारेवाड, भास्कर सोलनकर, शंकर नरोटे, नामदेव नरोटे, बालाजी देवकते, कोमल सोडनर, शाहू कोंमले, साखरू गायकवाड, शंकर सोलनकर, आकाश सोलनकर, डॉ. बनसोड यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *