समाजवादी प्रबोधिनी व व्ही वाय आबा पाटील समाज प्रबोधन अकॅडमी मार्फत रामानंदनगर येथे आचार्य शांतारामबापू गरूड व्याख्यानमाला                 

.लोकदर्शन 👉 राहुल खरात

_धर्म आणि राजकारण याच्या सांगडीने अधोगती होते_ प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन
देशाच्या राजकारणाची दशा दिसत आहे तर दिशा स्पष्ट आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे धर्म आणि राजकारणाची फारकत पाहिजे. या अर्थाने देशातील राजकारणातील व्यक्तिवाद व धार्मिक ध्रुवीकरणाने अधोगती होत असून ती थोपवली पाहिजे. असे प्रतिपादन प्रसाद कुलकर्णी यांनी केले
रामानंदनगर येथे समाजवादी प्रबोधिनी व व्ही वाय आबा पाटील समाज प्रबोधन अकॅडमी आयोजित आचार्य शांतारामबापू गरूड व्याख्यानमालेत राजकारणाची दशा आणि दिशा या विषयावरील पहीले पुष्प त्यांनी गुंफले.
याप्रसंगी ते म्हणाले पुरोगामी पक्षांनी वैचारिक पायावरील नवी पिढी घडवली नाही ही मोठी कमजोरी असल्याने राजकारणाचे व संस्कृतीचे विकृतीकरण आणि बाजारीकरण झाले आहे. राजकारण हे सत्ताकारण बनले असून भुलथापांना व खोटे बोलण्याला सीमा राहीली नाही. लोकांच्या अपेक्षांना प्राधान्य देवुन लोकांना विश्वासात घेतले तर सक्षम पर्याय तयार होईल. याप्रसंगी डॉ अमोल पवार यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रा. एन. डी. पाटील, कॅप्टन रामभाऊ लाड, कॉ. नामदेव गावडे यांना श्रध्दांजली वाहीली. आदम पठाण सर यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचलन केले. यानंतर सौ. मोहीते मॅडम यांच्या सुश्राव्य पसायदानाने समारोप झाला . याप्रसंगी व्ही वाय पाटील, डॉ अमोल पवार, मारुती शिरतोडे,शिवाजीराव अडसूळ, पी. के. माने, प्रा लक्ष्मण मोटे,एन. जे. पाटील, फाटकगुरुजी, बी. बी. खोत, जयवंत मोहीते, तानाजी चव्हाण, उत्तम सुतार, सुनिल पाटील, दिलीप पाटील, संदीप नाझरे, शहाजी चव्हाण, परवेज पिरजादे, सुनिल पाटील आदि मान्यवर हजर होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *