दिव्यांगाना हकाचा 5% निधी 20 एप्रिल पर्यंत मिळवून देण्यात यश

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर


⭕*दिव्यांग बांधवांवरचा अन्याय कदापी सहन करणार नाही – विवेक बोढे भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष*

घुग्घुस परिसरातील दिव्यांग बांधवाना 5% निधी उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सूचनेनुसार भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी मुख्याधिकारी अर्शीया जुही यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

मागील दोन वर्षांपासून घुग्घुस परिसरातील अनेक दिव्यांग बांधवाना शासनाचा 5% दिव्यांग निधी मिळाला नाही त्यामुळे संतप्त दिव्यांग बांधवानी येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांची भेट घेतली व आपल्या व्यथा सांगितल्या ही समस्या लक्षात घेत भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी अनेक दिव्यांग बांधवासह मुख्याधिकारी अर्शीया जुही यांची नप कार्यालयात जाऊन भेट घेतली व चर्चा केली. सकारात्मक प्रतिसाद देत मुख्याधिकारी अर्शीया जुही यांनी सन 2021-2022 ते 2022 ते 2023 मागील दोन वर्षाचा 20 एप्रिल पर्यंत 5% निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले चर्चे नंतर निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी बोलतांना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले दिव्यांग बांधवांवर होणारा अन्याय कदापिही सहन केला जाणार नाही मागील दोन वर्षांपासून दिव्यांग बांधवाना निधी मिळत नाही ही लाजिरवाणी बाब आहे दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहो. दिव्यांग बांधवांच्या मागण्याची तत्काळ दखल घेत 20 एप्रिल पर्यंत निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुख्याधिकारी अर्शीया जुही यांनी दिल्या बद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.

निवेदन देतांना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, साजन गोहने, शाम आगदारी, श्रीकांत सावे, मोमीन शेख, असगर खान व दिव्यांग बांधव उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *