गडचांदूर येथे 26 मार्च पासून आमदार चषक 2022 भव्य खुले ऑल इंडिया व्हॉलीबॉल सामने.                           

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
दृढ संकल्प स्पोर्टिंग क्लब गडचांदूर व भीमसेना बहुउद्देशीय सुधार संस्था गडचांदूर च्या वतीने आमदार चषक 2022 भव्य खुले ऑल इंडिया व्हॉलीबॉल सामान्यांचे आयोजन दिनांक 26,27, व 28 मार्च ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, गडचांदूर च्या पटांगणात घेण्यात येत असून या सामन्या मध्ये महिला व पुरुष विभागाचे हरियाणा ,पंजाब, दिल्ली, कर्नाटक, बंगलोर, भुवनेश्वर, आग्रा, यवतमाळ, मुंबई ,गुजरात आदी संघ उपस्थित होणार आहे .
पुरुषांच्या गटात विजेत्या संघाला रोख 51 हजार रुपये व सन्मानचिन्ह तर उपविजेता संघाला रोख 31 हजार रुपये रोख पुरस्कार तर तृतीय पुरस्कार रोख 21 हजार रुपये दिला जाईल.
महिला गटातील विजेत्या संघाला रोख 20 हजार रुपये तर उपविजेता संघाला रोख 15 हजार रुपये तसेच तृतीय पुरस्कार रोख 10 हजार रुपये, दिला जाईल,याशिवाय वैयक्तिक पातळीवर उत्कृष्ट खेळाडू ला पुरस्काराने गौरविण्यात येईल.
गडचांदूर शहरात प्रथमच होत असलेल्या भव्य ऑल इंडिया व्हॉलीबॉल सामन्याचे उद्घाटन 26 मार्च ला आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते होणार आहेत, अध्यक्ष स्थानी राजुरा नगर परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण धोटे राहील तर स्वागताध्यक्ष म्हणून नगराध्यक्षा सविता टेकाम राहील.
सामन्याच्या यशस्वीते साठी दृढ संकल्प स्पोर्टिंग क्लब चे अध्यक्ष विनोद तराळे, सचिव विकी मुन भिमसेना बहुउद्देशिय संस्था चे अध्यक्ष नगरसेवक राहुल उमरे,तसेच इतर मेहनत घेत आहेत, क्रीडा प्रेमींनी सामन्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहेत.
,,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *