कोरपना तालुक्यात भाजपाची ची बूथ बैठक संपन्न¡

लोकदर्शन 👉 मोहन भारती

 

⭕बुथ समित्या,पेज प्रमुख दोन दिवसात पूर्ण करा श्री खुशाल भाऊ बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर यांचे आव्हान.

गडचांदुर ÷भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने विश्राम गृह कोरपना येथे बुथ बैठकीचे आयोजन करण्यात आले .या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री खुशाल भाऊ बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर हे होते. तर प्रमुख उपस्थिती श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष,श्री राजूभाऊ घरोटे किसन आघाडी जिल्हाध्यक्ष चंद्रपूर,श्री अरुण भाऊ मडावी माजी सरपंच, श्री कवडू पाटील जरिले तालुका उपाध्यक्ष,श्री विजय रनदिवे माजी सरपंच,श्री शशिकांत भाऊ अडकिने माझी सरपंच,श्री प्रमोदजी कोडापे माझी सरपंच आदी मान्यवर उपस्थित होते. श्री खुशाल भाऊ बोंडे यांनी बुथ समित्या,पेज प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख,व इतर विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन केले बुथ विषयी संपूर्ण तालुक्याचा आढावा घेतला ,व उरलेल्या बुथ समित्या,पेज प्रमुख तसेच इतर उरलेली कामे दोन दिवसात पूर्ण करा असे आवाहन केले., व इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले .प्रास्ताविक श्री नारायण हिवरकर यांनी केले व संचालन विजय रनदिवे यांनी केले .तर आभार प्रमोद कोडापे यांनी मानले .बैठकीला भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *