स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील शिवजयंती दिन व कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा स्मृतीदिन याचे औचित्य साधून मारुती शिरतोडे यांचेकडून 75 पुस्तकांचे मोफत वाटप

लोकदर्शन 👉 राहुल खरात सर


भारतीय स्वातंत्र्याचे हे 75 वे वर्ष सुरू आहे. या देशाचा स्वातंत्र्यलढा जगभर गाजला. देशाला अन्यायाविरुद्ध लढण्याची मोठी परंपरा आहे. देशाच्या संघर्षमय इतिहासात आपल्या कर्तुत्वाने जगात नाव कोरलेले एकमेव अजरामर राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज . छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे रोमांचकारी आणि प्रेरणादायी घटनानी भरलेला मोठा इतिहास आहे. त्याचबरोबर विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात या महाराष्ट्राच्या भूमीत श्रमिक, कष्टकरी कामगार वंचित घटकांच्या वरील अन्याय अत्याचाराविरुद्ध आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावरची लढाई करून अनेक संघर्षमय लढे उभे करणारे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, पुरोगामी विचारवंत, लेखक शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे जीवनसुद्धा हे अत्यंत त्यागमय आहे. त्यांनीच प्रथम शिवचरित्र निपक्षपातीपणे लिहले. व लोकांच्यापुढे खराखुरा शिवाजी राजा उभा केला गेला. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची 19 फेब्रुवारी रोजी ची जयंती व कॉम्रेड गोविंद पानसरे यांची 20 फेब्रुवारी ची पुण्यतिथी या दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा नंबर 2 पलूस येथील उपक्रमशील शिक्षक, पुरोगामी चळवळीचे अभ्यासक मारुती शिरतोडे यांनी गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या पंच्याहत्तर प्रती चे मोफत वाटप करण्यात आले. पलूस पंचायत समिती सभापती, उपसभापती गटविकास अधिकारी गटशिक्षणाधिकारी तसेच सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी शिक्षक यांना हे पुस्तक देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे खुरे स्वराज्य निर्मितीचे कार्य त्यांचा राज्यकारभार यावर निपक्ष:पातीपणे प्रकाशझोत टाकणारे व जगात लाखो पुस्तके विविध भाषांत भाषांतर होऊन वितरित झालेले शिवाजी कोण होता? हेच एकमेव पुस्तक आहे. सध्याच्या पिढीने व समाजातील सर्वच घटकांनी पानसरेंनी लिहिलेले शिवाजी कोण होता? हे पुस्तक वाचलेच पाहिजे अशी प्रतिक्रिया मारुती शिरतोडे यांनी दिली.. पुस्तके वाटप प्रसंगी शाळा नं.2 पलूस च्या वरिष्ठ मुख्याध्यापिका सौ.उज्वला पाटील,अपग्रेड मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम चव्हाण,तंत्रस्नेही शिक्षक बाळासाहेब खेडकर, लक्ष्मण शिंदे ,उत्तम पाटील व इतर शिक्षक कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *