आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते पोलिओ लसीकरण मोहीमेचे शुभारंभ.

लोकदर्शन 👉 मोहन भारती


राजुरा :– उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे आज दिनांक २७ फेब्रुवारी रोजी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पोलिओ लसीकरण मोहीमेचे शुभारंभ करण्यात आले. आमदार धोटे यांनी डाॅक्टरांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुलांना पोलिओ लसीकरणाचे डोज दिले. आणि यामाध्यमातून त्यांनी क्षेत्रातील जनतेला १०० % पोलिओ लसीकरण करून मोहिम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालय राजुराचे वैद्यकिय अधिकारी लहु कुळमेथे, माजी नगरसेवक हरजितसिंग संधू, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक राव, उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here