पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांचा परभणी येथे नागरी सत्कार आणि दै. सोमेश्वर साथी आयकॉन पुरस्कार 2022 चा शानदार वितरण सोहळा संपन्न.

लोकदर्शन परळी ( प्रतिनिधी)👉राजेश सोनवने
भारतीय संविधानाने सामान्यातल्या सामान्य माणसाला स्वातंत्र्य,समता, बंधुता, सामाजिक न्यायाची देणं देत व्यक्तीहिता सह राष्ट्रहिताला प्राधान्य दिल्याने सक्षम माणूस घडविणारा संस्कार दिला आहे.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी एक व्यक्ती एक मत हा समता प्रस्थापित करणारा अधिकार भारतीयांना दिला.आज आत्मनिर्भर समाज निर्माण हे आपणा सर्वांचे ध्येय असले पाहिजे.शिक्षणाला संस्कारासह, संस्कृतीची जोड दिली गेल्याने क्षमता पूर्ण कौशल्याधिष्ठीत पिढी घडत आहे.स्वावलंबन आणि ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करताना आत्मशोधा बरोबरच आत्मोन्नतीचा मार्ग धुंडाळताना प्रामाणिक परिश्रमातून अभूतपूर्व यश संपादन करा.सदगुण आणि सदाचार ही व्यक्ती सह राष्ट्र उभारणी साठीची गुरुकिल्ली आहे.या सुवर्ण संधीचा फायदा घेत कौशल्य पूर्ण जगाचे नायक बना असा मूलमंञ नागरी सत्काराला उत्तर देताना स्वानुभवातून गांधीवादी विचारवंत पं.शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी दिला.
दै.सोमेश्वर साथीच्या वतीने छञपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून दै.सोमेश्वर साथी आयकॉन पुरस्कार- २०२२ चे वितरण आणि एकता सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित पं.शंकरप्रसाद अग्निहोत्री यांचा नागरी सत्कार प्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध उद्योजक अरुण मराठे, प्रमुख अतिथी मनपा उपमहापौर भगवानराव वाघमारे,स्थायी समीती सभापती गुलमीर खान, एपीआय कोतवाली चे फेरोज खान पठाण,स्वागताध्यक्ष एकताचे संस्थापक अजमत खान, प्रमुख अतिथी अभिनेता अदनान खान,एकताचे विदर्भ अध्यक्ष,अनिल नरेडी,आयुर्वेदाचार्य डॉ.एस.एन.राव,समाजसेविका, कवयञि संगीता ताई जामगे, तुषार मराठे आदींची उपस्थिती होती.
जगात जर्मनी भारतात परभणी या म्हणी प्रमाण अशक्य ते शक्य करुन दाखवणारी परभणीची माणसं.येथील माणसं आणि कणसं कसदार असल्याने परभणीत कोणतंही कार्य लोकसहभागातून सहज पुर्ण होते.खड्डे मुक्त संकल्प घेवून मनपा कार्य करित असून विकासकामी परभणीकरांचे उत्तम सहकार्य लाभत आहे.उपमहापौर पदावर आल्या पासून मी परभणी करांचे प्रश्न सोडवत आहे,याचं समाधान व्यक्त करित मनपाच्या वतीने पं.शंकरप्रसाद अग्निहोत्री यांचे स्वागत करीत त्यांना नागरी सत्कार आणि वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा मनपा उपमहापौर भगवानराव वाघमारे यांनी दिल्या.
परभणी मनपा, परभणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द असून स्थायी समिती सभापती या नात्याने काम करताना परभणी करांनी दाखविलेला विश्वास, पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडताना सेवेचे समाधान लाभत असल्याचे मत मनपा स्थायी समिती सभापती गुलमीर खान यांनी व्यक्त करीत अग्निहोत्री आणि पुरस्काराचे मानकरी यांना शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय दै. सोमेश्वर साथी आयकॉन पुरस्कार- २०२२ चे वितरण जिल्हा युवक काॅग्रेसचे उपाध्यक्ष पवन निकम, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, प्राचार्य डॉ .विठ्ठल घुले, प्राचार्य कविता कराड,प्रा.डाॅ.रामकृष्ण बदणे,आदर्श सरपंच नवनाथ मुंढे, मुख्याध्यापक कृष्णकुमार दडके ,सुरेंद्र लोखंडे , कोतवाली चे एपीआय फिरोज खान पठाण, सहा.पोलीस निरीक्षक शहर वाहतूक सचिन इंगेवाड, सुप्रसिद्ध कवयञी संगीताताई जामगे, हरिश्चंद्र घुले, सुरेश हिवराळे, प्रा.डॉ.अशोक उबाळे ,प्रा डॉ राजीव यशवंते, प्रा.डाॅ. नसीम बेगम,प्रा.डॉ.अरुणा ईटकापल्ले,सौ. प्रमिला लोखंडे, शहानूर पठाण, विजयकुमार तिवारी, रामेश्वर पुरी,प्रा.रामराव कटारे, श्रीनिवास करखेलीकर ,माधव नालमवाड, शेख अफसर शेख सालार, अभिनेता गुल्लू दादा, अभिनेता रुपेश डहाळे, प्रा.अरुण पडघन असे एकुण ३१ मानकरी यांना पं.शंकरप्रसाद अग्निहोत्री आणि मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
पुरस्काराने जबाबदारीत वाढ होते. अधिक आणि चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते.हा पुरस्कार आत्मिक बळ देणारा असल्याचे मत अध्यक्षिय समारोपात अरुण मराठे यांनी व्यक्त केले.
एकता इंटरनॅशनल फिल्म प्रोडक्शन निर्मित संविधान एक रास्ता या चिञपटाचा शुभमुहूर्त पं.शंकरप्रसाद अग्निहोत्री आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजमत खान यांनी केले.
पुरस्कार सोहळ्याचे मुख्य आयोजक बालासाहेब फड यांनी आभार व्यक्त केले.प्रा.अरुण पडघन यांनी संचलन केले.राष्ट्गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *