नवोपक्रम स्पर्धेत पंकज मत्ते यांना प्रथम पुरस्कार।   

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे द्वारा घेण्यात आलेल्या ऑनलाईन नवोपक्रम स्पर्धेत माध्यमिक गटातून जनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर येथिल पंकज वामनराव मत्ते यांचा नवोपक्रम जिल्हा स्तरावर सर्वोत्कृष्ट ठरला.
यामध्ये पंकज मत्ते यांनी कोरोना काळात व्हाट्सअप- टेलिग्राम बनले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दूत या विषयावर नवोपक्रम सादर केला. या नवोपक्रमाचा मुख्य उद्देश गणित आणि विज्ञान विषयाचा पाया मजबूत करणे हा होता . विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची आवड निर्माण होऊन ते स्वतः स्वतःचे शिक्षक बनले पाहिजे यासाठी त्यांनी डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट पंकज मत्ते मॅथसायन्सटीचर डॉट कॉम या वेबसाईटच्या माध्यमातून बेसिक मॅथमॅटिक्स फाउंडेशन कोर्स मनोरंजक पद्धतीने तयार केला. याद्वारे विद्यार्थ्यांना 26 कौशल्यावर दीडशे प्रश्नावल्या च्या माध्यमातून पंधराशे प्रश्नांचा सराव विद्यार्थ्यांना करता येतो. त्याचप्रमाणे इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर सोळा प्रश्नावल्या तयार केले आहेत. त्याची दखल घेत त्यांना जिल्हा स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. हा नवोपक्रम तयार करण्यासाठी त्यांना शाळेचे मुख्याध्यापक बी. के. लांडे, बल्लारपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र लामगे, माजी गटशिक्षणाधिकारी वर्षा फुलझेले
यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. शाळेतील शिक्षक, विस्तार अधिकारी व सर्व साधन व्यक्ती आदींचे सहकार्य लाभले.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here