विहिरगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी.

लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त विहिरगाव येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना वंदन करण्यात आले.
या प्रसंगी सरपंच अॅड. रामभाऊ देवईकर, उपसरपंच निलकंठ खेडेकर, पोलीस पाटील सचिन बोढे, माजी उपसरपंच सुरेश आस्वले ,ग्रामपंचायत सदस्या माधुरी चिडे, प्रेमलता बोढे, ग्रामसंघाच्या अध्यक्षा प्रियंका होरे, उपाध्यक्षा शिवानी उपलंचीवार, पशुराम वाघमारे, मारोती वनकर, सहमिञ क्लबचे सर्व सदस्य व गावांतील इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन माजी उपसरपंच इर्शाद शेख यांनी तर आभार प्रदर्शन सोमेश्वर शेंडे यांनी केले. कार्यक्रमाला स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here