पंधरा दिवसापासून म्हसवड मध्ये सुरू आहे पोलीस व चोरट्यांचा पाठशिवणीचा खेळ !

लोकदर्शन 👉 सरपाते सर विशेष लेख

म्हसवड :- गेल्या काही
दिवसापासून म्हसवड मध्ये बंद आसलेली घरे व बंद दुकाने चोरटे शहरातील मेन रस्त्या वरील दुकाने सोडून गल्ली बोळातील घरे, दुकाने फोडून गल्ली बोळातुनच चोरटे पसार होत असल्याने ना सी सी टी व्ही मध्ये येतात ना कोणाला दिसत नाहीत फक्त चोर आले चोर आले , जागे व्हा जागे व्हा, आमुकाच्या घराची कडी कोंडा लावला, त्या गल्लीत घराच्या कड्या वाजवल्या ह्या गल्लीतून त्या गल्लीत चोर गेले ग्राम सुरक्षादलाचे कार्यकर्ते लवकर पाठवा साहेब तुम्ही व तुमचे पोलीस कर्मचारी लवकर पाठवा असे रात्रभर पोलिसांचे फोन खनाणत चोर व पोलिस आणि ग्राम सुरक्षादलाचे कार्यकर्ते यांचा पाठशिवणी खेळ पंधरा दिवसापासून सुरु आसल्याने चोरट्यांचा कमाल तर पोलिसांची दमछाक झालेली दिसत आहे

म्हसवड मध्ये गेल्या पंधरा दिवसापूर्वी चोरट्यांनी एकाच दिवशी बाहेर गावी कामा निमित्त गेलेल्या शहरातील नागरीकांची बंद असलेली सात घरे फोडून हजारो रुपयांची रोकड व सोन्याची दागिन्याची चोरी केली त्यानंतर तृप्ती मंगल कार्यालया शेजारी असलेल्या लोखंड पत्रे विकणार्या दुकानदारांची ५१ हजार रुपयांची रोकड लंपास केली त्यानंतर मात्र म्हसवड पोलिस सक्रीय झाले संशयित म्हणून चौकशी साठी ५० ते ६० लोकांना पोलीस ठाण्यात आणून पोलिसी खाक्या दाखवला मात्र पोलिसांच्या हाती आज पर्यत काहीच लागले नाही आज हि पोलिसी नजर
संशयीत म्हणून शहर परिसरात फिरताना दिसत आहे म्हसवड पोलीसांच्या बरोबर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस कर्मचारी हि शहरात साध्या वेशात फिरत आहे मात्र चोरटे काय सापडायचे नाव घेत नसल्याने पोलीस कर्मचारी यांची दमछाक एकीकडे तर दुसरीकडे वरिष्ठ अधिकारी यांची झापाझापी यामुळे पोलिस यंत्रणा चोरट्या विषयी काहीच बोलण्यास नकार देत आहेत

तर दुसरीकडे शहरात आज हि चोरटे रात्रीचे कोठून येतात व कशाने जातात कि म्हसवड मध्येच घरोबा केला आहे, म्हसवड मधील नागरीक बाहेर गावी गेला आहे हे बाहेरील चोरट्यांना कसे माहिती बंद घर आहे हि माहिती नक्की कोण चोरट्यांनी देत आहे , या चोरट्यांला मदत तर म्हसवड मधील कोणाची मिळत आहे हा मोठा संशोधनाचा विषय आसुन पोलिस मात्र त्या स्थानिक खबर्यासह चोरट्यांचा तपास लावण्यात अपयशी ठरत आहेत
शहरात आज चोरट्यांची मोठी दशहत बसली आसुन नागरीक आपल्या लहान मुलांच्या सह महिलावर्गाणी आपल्या अंगावरील दागीने काढून सुरक्षीत ठिकाणी ठेवण्यात धन्यता मानली आहे एका बाजूला चोरट्यांनी
सर्वसामान्यांच्या जिवाला मात्र चांगलाच घोर लावला असताना गेल्या दोन वर्षापासुन कोरोनामुळे सतत होणाऱ्या लॉकडाउनमुळे मेटाकुटीला आलेली जनता व्यवहार सुरळीत होवु लागल्याने आता कुठे सावरु लागली असताना चोरट्यांचे नाव काढले तर अंगावर काटा फुटत आहे
गेल्या महिन्यात एका बँक अधिकाऱ्याचे बंद घर फोडले, ढाकणीत तर मंदीराच्या मुर्ती चोरल्या,न्यायाधीशाच्या घर, नगरसेवकांचे घर, राजेमाने यांच्या वाड्यात हि चोरट्यांनी प्रवेश केला होता
म्हसवड पोलिसांकडे चोरट्याचे मोठे आव्हान आसुन पोलिसांनी म्हसवड शहरात महाराष्ट्र बाहेरील चार ते पाच हजार कामगार राहतात त्यांची ना माहिती पोलीस ठाण्यात ना ज्यांनी त्या परप्रांतीयांना राहण्यास घरे भाडोत्री दिली त्या घर मालकांनी त्यांच्या नोंदी ठेवल्या आहेत का ते दिवसा कोणाकडे काम करतात रात्रीचे कोठे जातात किती वाजता घरी येतात याची माहिती घरमालक यांना आहे का किंवा घर मालकाने त्या भाडोत्रीची माहिती पोलिस ठाण्यात दिली का यांची या सर्व गोष्टीची माहिती पोलीस ठेवणार का

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *