आमदार सुभाष धोटे यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन.

लोकदर्शन 👉मोहन भारती


राजुरा :– अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा नगर परिषदेचे वतीने नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे समोर निर्माण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्नाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून महाराजांना विनम्र अभिवादन केले. विशेष बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुर्नाकृती पुतळा अनेकांसाठी ऊर्जास्थान, शक्तीस्थळ बनून प्रेरणा देत आहे. शहरातील, परिसरातील अनेक मान्यवर, जनसामान्य नागरिक येथे भेट देऊन आज महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांना मानाचा मुजरा करुन त्यांना विनम्र अभिवादन करीत आहेत.
या प्रसंगी राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपनगरध्यक्ष सुनील देशपांडे, नगरसेवक गजानन भटारकर, न प राजुराचे विजय जांभुळकर, उमेश गोरे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here