महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त् घरोघरी शिवजयंती साजरी उपक्रम राबविणार :- विष्णु कारमपुरी (महाराज)

लोकदर्शन 👉 मोहन भारती
सोलापुर दि.18/2/2020 शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने महाराष्ट्राचे जाणते राजे हिंदवी स्वराज्य् संस्थापक श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त् घरोघरी शिवजंयती साजरी हे उपक्रम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त् शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने घरोघरी शिवजयंती साजरी या उपक्रमांतर्गत दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी दहा वाजता कामगार सेना कार्यालय कुचन नगर येथे महाराजांची जयंती साजरा करुन त्यांच्या प्रतिमेस व मुर्तीस महापूजन करुन त्यानंतर सुमारे 51 श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयांचे वाटप झोपडपटटयांमधील गरिबातल्या गरीब महिला विडी कामगारांना देण्यात येणार आहे प्रत्येक झोपडपटटीमध्ये पाच याप्रमाणे शिवरायांचे महापूजा व सन्मान मुर्तीस अलंकारिक करुन पूजन करुन झोपडटटीतील गरीब कुटुंबे असलेल्या महिला विडी कामगारांच्या घरोघरी जाऊनश्री शि्वरायांची मुर्ती त्यांना येणार आहे. आणि त्या कुटुंबाला शिवरायांच्या मुर्तीचे पूजन दररोज करावे अशा सुचना देणार आहेत.
यामध्ये गांधी नगर झोपडटटी नंबर 7, कुचन नगर झोपडपटटी नंबर 1,2 मोतीलाल झोपडटटी, कुरबान हुसेन झोपडटटी, विनोबा झोपडटटी, अलमारी झोपडटटी, संयुक्त् झोपडटटी, दत्त्नगर ,लोधी गल्ली येथील झोपडटटी, भगवान नगर झोपडटटी, आणि राहुल गांधी झोपडटटी, याठिकाणी यांचा समावेश महिला कार्यकर्त्या विडी कामगार यंत्रमाग कामगार व सर्व कामगार बंधु-भगिनी सर्व कामगार बंधु भगिनींच्या उपस्थितीत संपन्न्
जय शिवाजी – जय भवानी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here