छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य गडचांदूर येथे आयोजित मोफत सुपरस्पेशालिटी मेडिकल कॅम्प मध्ये २८० रुग्णांनी घेतला लाभ*                           

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदुर:-
जनरल मेडिकल प्रॅक्टिशनरस असोसिएशन गडचांदूर ,वाईल्ड लाईफ इनवारमेंट कंझरवेशन नेचरिंग फाऊंडेशन गडचांदूर , न .प. गडचांदुर , आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे , आचार्य विनोबा भावे संचालित सिद्धार्थ गुप्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, व ग्रामीण रुग्णालय गडचांदुर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून गडचांदूर येथे डॉ, प्रदिप खेकडे यांच्या रुग्णालयात मोफत भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुभाष भाऊ धोटे यांच्या हस्ते पार पडले , कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी डॉक्टर प्रदीप खेकडे , होते इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते, मोफत आरोग्य तपासणी शिबिरात , हृदयरोग निदान व तपासणी, कॅन्सररोग निदान व तपासणी शिबिर, दंतरोग तपासणी व औषध वाटप,व मोफत इसिजी,बी.पी. शुगर तपासणी, आरोग्य शिबिरात , 280. पेक्षा अधिक रुग्णांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. यावेळी जनरल मेडिकल प्रॅक्टिशनरस असोसिएशन गडचांदूर ,चे सर्व सदस्य , व वाईल्डलाईफ इन्व्हरमेंट कंझरर्वेशन नेचरिंग फाउंडेशन चे सर्व सदस्य ,व न.प. गडचांदुरचे कर्मचारी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here