खामोना ग्रामपंचायतीचे सरपंच हरिदास झाडे सरपंच पदावरुन पायऊतार.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

⭕जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे आदेश.

राजुरा :– राजुरा तालुक्यातील खामोना ग्रामपंचायतीचे सरपंच नेहमीच चर्चेत असतात. सन २०२१ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर त्यांची सरपंच पदावर वर्णी लागली. माजी आमदार सुदर्शन निमकर यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. खामोना गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या माधरा गावचे प्रतिष्ठित नागरिक सुधाकर नारायण धोटे यानी हरिदास झाडे यांना सरपंच पदावरून पाय उतार करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली होती. दरम्यान सरपंच हरिदास झाडे यांनी शासकीय जमीनीवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध होत असल्याचा ठपका लावत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश पारित केलेला आहे.
हरिदास झाडे यांनी राजुरा तालुक्यातील मौजा खैरगांव रिठ येथील जवळपास ५ एकर सरकारी जमीनीवर बेकायदेशिरपणे अतिक्रमण केले आहे. गाव नमुना १ई मध्ये त्यांनी अतिक्रमण केल्याचे आढळले. तत्कालीन मंडळ अधिकारी यांनी मोका पंचनामा केला असता जवळपास ५ एकर जमीनीवर हरिदास झाडे यांनी अतिक्रमण केले असून त्या ठिकाणी कापूस व ज्वारी पिकाची पेरणी केली असल्याचा अहवाल दिला. शासनाच्या अभिलेखातून देखील अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आले. सरपंच पदावर टांगती तलवार उभी राहीली असतांना हरिदास झाडे यांनी अनेकांचे उंबरठे झिजवले व काही वरिष्ठ नेत्यांची मदत घेवून पद वाचविण्याचा केवीलदाना प्रयत्न केल्याची चर्चा नागरिकांत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजुचे मते, कागदपत्रांची काळजीपूर्वक पडताळणी व प्रकरणाचा सखोल अभ्यास करून हरिदास झाडे यांचे सदस्यपद रद्द ठरविले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशामुळे हरिदास झाडे यांचेवर नामुष्की ओढावली आहे. शासनाच्या जमीनीवर अतिक्रमण करणे ही बाब दुर्देवी असून सत्याचा विजय झाला आहे. कायद्याचा आदर करत झालेल्या चुकीबद्दल जनतेची माफी मागून त्यांनी पदच्युत व्हावे अशी प्रतिक्रिया माजी सरपंच लहु किसन चहारे, ग्रामपंचायत सदस्य कवडू बळीराम सातपुते गणेश चहारे, सुधाकर नारायण धोटे, बंडू घुगूल, मारोती चन्ने, रामचंद्र मोरे, आदींनी व्यक्त केली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *