कोरपना – वणी मार्गावर बस फेऱ्या सुरू करण्याची मागणी

लोकदर्शन 👉मोहन भारती

कोरपना – कोरपना येथून वणी मार्गावर सद्यस्थितीत एकही बस फेरी सुरू नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते आहे.याकडे राजुरा व वणी आगाराने लक्ष देऊन बस सुरू करावी अशी मागणी परिसरातील नागरिकाकडून होते आहे. वणी ही परिसरातील मोठी बाजारपेठ असल्याने दैनंदिन जाणाऱ्या – येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र बसेस बंद असल्याने खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. कोरपना वरून चंद्रपूर, आदिलाबाद या मार्गावर बस सेवा सुरू झाल्या आहे. परंतु वणी मार्गावर अद्यापही एकही बस येत नाही. त्यामुळे कोरपना , तुकडोजी नगर, हेटी , कोडशी , मूर्ती , बोरी , ढाकोरी , गोवारी पारडी , कुरई , डोरली, वेळाबाई , आबई, बोरगाव , खंदाला , शिरपूर , चारगाव , केसूर्ली, मंदर , वाघदरा , लालगुडा , वणी आदी गावच्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तासनतास ताटकळत राहून खासगी वाहनाची वाट पाहत राहावे लागते आहे. परिणामी नागरिक त्रस्त झाले आहे. जाण्या व परतीसाठी सकाळी सात , नऊ , अकरा , दुपारी एक , तीन , चार , सायंकाळी साडे पाच वाजता बस सेवा सुरू करणे आवश्यक आहे. या मार्गावर अनेक नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी, व्यापारी आदी प्रवास करतात. त्यांना ही बसेस अभावी जाण्या येण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहे. यावर राज्य परिवहन महामंडळाच्या राजुरा , वणी आगारांनी समन्वय साधून जनतेची गैरसोय दूर करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here