कोरपना नगर पंचायत वर काँग्रेसचा झेंडा।     

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना – कोरपना नगर पंचायत च्या अध्यक्ष – उपाध्यक्ष ची निवडणूक गुरुवार दिनांक १७ रोजी पार पडली.
या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाकरीता
काँग्रेसच्या नंदाताई बावणे यांना १२ तर भाजप च्या वर्षा लांडगे यांना ५ मते पडली.यात नगराध्यक्षपदीं काँग्रेस च्या नंदाताई बावणे याची निवड झाली.
उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडीत काँग्रेसचे इस्माईल शेख यांना १२ तर शेतकरी संघटना – भाजपा युतीच्या आशा झाडे यांना पाच मते पडली. यात उपाध्यक्ष पदी काँग्रेस चे इस्माईल शेख यांची वर्णी लागली. या निवड प्रक्रियेप्रसंगी राजुरा चे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे , तहसिलदार महेंद्र वाकलेकर, नगर पंचायत मुख्याधिकारी विशाखा शेळकी व नगर पंचायत कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here