सावित्रीबाई फुले विद्यालयात संत रविदास महाराज जयंती।

लोकदर्शन 👉 मोहन भारती

==================================
गडचांदूर- सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सवित्रिबाई फुले विद्यालयात चर्मकार समाजाला प्रगतीची दिशा दाखवणारे थोर समाजवादी संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे,गजानन बोबडे,मरसकोल्हे,कोंगरे,मेश्राम,आत्राम,सुषमा शेंडे, माधुरी उमरे,विद्या शंभरकर,ज्योती चटप,भुवनेश्वरी गोपमवार तथा शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थीगण उपस्थित होते.याप्रसंगी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष,शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय धर्मराज काळे यांनी संत रविदास महाराज यांचे जयंती प्रित्यर्थ उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन तथा आभार सुरेश पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here