युवा चेतना अभियानाची मंगी येथून सुरुवात     

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर :-
अंबुजा सिमेंट फाउंडेशन व्दारा संचालित कौशल्य तथा उद्योजकता विकास संस्थेद्वारे युवा चेतना अभियानाची ग्राम मंगी येथुन थाटात सुरुवात दहा जानेवारी पासुन करण्यात आली. या अभियाना अंतर्गत तरुणांमध्ये चैतन्य निर्माण करून त्यांना कौशल्य तथा उद्योजकते विषयी रुची निर्माण करण्याचा आहे.
कार्यक्रमाला अंबुजा सिमेंट फाउंडेशन चे सेडीचे प्राचार्य प्रमोद खडसे हे होते तर ग्राम मंगी येथील उपसरपंच वासुदेवराव चाफले माजी जि. प. सभापती भिमराव पुसाम,गणपतराव चाफले,ग्रामसेवक घुगे, परशुराम तोडासे,प्रकाश येडमे, आणि ग्रा. प. सदस्य शंकर तोडासे व गावातील मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. बदलत्या परिस्थितीत उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी प्राप्त करण्यासाठी कौशल्य विकासा शिवाय दुसरा पर्याय नसल्याचे मत प्राचार्य प्रमोद खडसे यांनी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सांगितले. तसेच तरुणांना विविध उपलब्ध संधी बाबत माहिती देवुन योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचा मानस व्यक्त केला. उपस्थित वासुदेवराव चाफले यांनी मंगी गावातील युवकांच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील युवक, पालक, शिक्षक, व ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन शाळेचे मुख्याध्यापक बोंडे यांनी केले तर प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी रवींद्र मडावी यांनी केले. या प्रसंगी रोजगार अधिकारी अंबुजा सिमेंट फाउंडेशन चे नरेश सुभे या प्रसंगी उपस्थित होते. सदर कार्यक्रम परिसरातील सर्वच गावामध्ये आयोजित करण्याचा व तरुणांना मार्गदर्शन करण्याचा मानस या प्रसंगी प्रमोद खडसे यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here