सेवालाल महाराजांचे कार्य प्रेरणादायी. — आमदार सुभाष धोटे.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– श्री सेवालाल महाराज शिक्षण संस्था धानोली द्वारा संचालित श्रीमती गोपिकाबाई सांगा पाटील प्राथमिक/ माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळा, राजुरा च्या वतीने संत सेवालाल महाराज यांची २८३ वी जयंती आमदार सुभाष धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी आमदार धोटे यांच्या हस्ते योग प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की संत सेवालाल महाराजांनी नेहमी गोरगरीब लोकांची सेवा केली, समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांचे कार्य नेहमी मानवजातीला प्रेरणादायी राहिल असे गौरवोद्गार काढले.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुधाकर जाधव, सचिव प्रकाश जाधव, प्रभाकर चव्हाण, गजानन चव्हाण, हरिचंद्र राठोड, मुख्याध्यापिका छाया मोहितकर, मुख्याध्यापक दिनेश खोब्रागडे, शिक्षक वृंद यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here