वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाच्या नावाचा आणि नसलेल्या पदाचा गैरवापर करून पैसे उकळणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कायदेशीर फौजदारी दाखल करावी.

लोकदर्शन 👉 राहुल खरात सर

*⭕वंचित बहुजन आघाडीचे मिरज ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांना निवेदन…*

मिरज
दि. १४ फेब्रुवारी २०२२

सदर निवेदनात म्हटले आहे, अशोक गणपतराव शिंदे रा. गणेशनगर मल्लेवाडी. ता. मिरज जि. सांगली. यांच्याकडून पुराव्या सहित आमच्या पक्षाच्या नावाचा व नसलेल्या पदाचा गैरवापर श्री. भिमराव मधुकर कोरे रा. टाकळी रोड या व्यक्तीने केला असल्याचे निदर्शनास आले आहे. सोबत त्या व्यक्तीने संबधित अशोक गणपतराव शिंदे यांचे काम करण्यासाठी म्हणून वंचित बहुजन आघाडी च्या नावावर पक्षाचे पत्र तयार करून स्वतः भिमराव कोरे, कार्याध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी सांगली असा उल्लेख करून दत्त इंडिया प्रा. लि. यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे त्याची पत्र सोबत जोडत आहे. आणि हे काम करून देण्यासाठी अशोक गणपतराव शिंदे यांच्या कडून तीन टप्प्यात ३०,००० रुपये पक्षाच्या नावाने व नसलेल्या पदाच्या नावावर उकळले आहे. तरी सदर व्यक्तीची वंचित बहुजन आघाडी कडून कोणत्याही पदावर अधिकृत नियुक्ती नसताना पक्षाचा व नसलेल्या पदाचा गैरवापर करत वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न सदर व्यक्तीकडून होत असल्याचे दिसत आहे म्हणून आम्ही आपणास विनंती करतो की, श्री. भिमराव मधुकर कोरे रा. टाकळी रोड या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी या मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे म्हणाले, सांगली जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीने वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी असल्याचे भासवून आंदोलन, विविध शासकीय निमशासकीय कार्यालयात पदाधिकारी असल्याचे खोटे पत्र व्यवहार केल्यास तसेच कार्यकर्ते यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास पक्षाला बाधा होईल असे कोणतेही कृत्य करणाऱ्या अशा व्यक्तीच्या वर कायदेशीर कडक फौजदारी करण्यात येईल असे जाहीर आवाहन केले आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण विभागातील अधिकृत पदाधिकारी उमरफारूक ककमरी, चंद्रकांत खरात, अनिल मोरे,संजय कांबळे, वसंत भोसले, अनिल अंकलखोपे, मनोहर कांबळे, सतिश शिकलगार, पवन वाघमारे आदी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *