खानापूर आटपाडी मतदारसंघातील रस्त्यासाठी 48 कोटी रुपयांचा निधी मंजूर – आमदार अनिलभाऊ बाबर

लोकदर्शन 👉 राहुल खरात

आटपाडी ;

खानापूर आटपाडी व विसापुर सर्कल मधील विविध रस्त्यांसाठी 48 कोटी रुपयांची मोठी तरतूद केल्याची माहिती आमदार अनिलभाऊ बाबर यांनी दिली.
महाराष्ट्र राज्याचा 2022-23 साठीचा अर्थसंकल्प शुक्रवारी विधीमंडळात सादर केला. या अर्थसंकल्पात खानापूर आटपाडी विसापुर सर्कलमधील रस्त्यांसाठी 47 कोटी 97 लक्ष 50 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असुन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणा-या मतदारसंघातील प्रमुख जिल्हा मार्गासाठी रु. 29 कोटी 45 लक्ष आणि जिल्हा परिषद अंतर्गत येणा-या इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्त्यांसाठी रु. 18 कोटी 52 लक्ष असा खानापूर आटपाडी व विसापुर सर्कलसाठी जवळपास 48 कोटी रुपयांचा भरीव निधी प्राप्त झाल्याचे आमदार अनिलभाऊ बाबर यांनी म्हटले आहे. रस्ते बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मिळालेल्या या निधीमुळे मतदारसंघातील रस्ते मजबुत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याचा शुक्रवारी जाहीर झालेला अर्थसंकल्प महाविकास आघाडी सरकारने सामान्य माणसाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून सादर केला असल्याने तो सर्वसावेशक आहे असे सांगताना कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या विकासाच्या पंचसुत्री घटकांना दिलासा देणारा असल्याचे आमदार अनिलभाऊ बाबर यांनी शेवटी म्हटले आहे.
यामध्ये *खानापूर तालुक्यातील* ढवळेश्वर कळंबी भाळवणी प्रजिमा 77 रु. 285 लक्ष, रेणावी पारे बामणी प्रजिमा 137 रु. 190 लक्ष, भाळवणी आळसंद प्रजिमा 90 रु. 237 लक्ष, अडसरवाडी पोसेवाडी मोही करंजे प्रजिमा 134 रु. 475 लक्ष, खानापूर बलवडी मेंगाणवाडी प्रजिमा 79 रु. 665 लक्ष, तामखडी घोटी पारे आळते प्रजिमा 26 रु. 665 लक्ष आणि नागेवाडी गोडाचीवाडी ग्रामा 87 रु. 47.50 लक्ष, चिखलहोळ हिंगणगादे ग्रामा 3 रु. 47.50 लक्ष, चिखलहोळ माहुली ग्रामा 175 रु. 47.50 लक्ष, मंगरुळ जोतिबा मळा ग्रामा 128 रु. 47.50 लक्ष, हिवरे हसबे वस्ती ग्रामा 230 रु. 47.50 लक्ष, आळसंद पलुस ग्रामा 225 रु. 76 लक्ष, कुर्ली जि.प. शाळा मार्गे चिंचणी ग्रामा 229 रु. 47.50 लक्ष, खानापूर गोरेवाडी ग्रामा 59 रु. 71.25 लक्ष, बलवडी जुना रामापुर ग्रामा 214 रु. 47.50 लक्ष, बलवडी जाधवनगर ग्रामा 52 रु. 47.50 लक्ष, आळसंद माळी वस्ती ग्रामा 206 रु. 47.50 लक्ष, शेडगेवाडी भडकेवाडी ग्रामा 33 रु. 47.50 लक्ष, बाणुरगड ताडाचीवाडी जरंडी ग्रामा 42 रु. 47.50 लक्ष, कळंबी हरेवाडी विटा ग्रामा 58 रु. 95 लक्ष, कुर्ली घाडगेवाडी ग्रामा 25 रु. 118.25 लक्ष इतका निधी मंजूर झालेला आहे.
*आटपाडी तालुक्यासाठी* रस्त्यासाठी निंबवडे दिघंची शिंगुर्णी प्रजिमा 54 रु. 285 लक्ष, गळवेवाडी आवळाई दिघंची प्रजिमा 55 रु. 142.50 लक्ष, पिंपरी खु वरचा जाधव मळा ते बंधा-यापर्यंत ग्रामा 194 रु. 47.50 लक्ष, तडवळे शिवाजीनगर जेठखलखडी ग्रामा 138 रु. 47.50 लक्ष, गोमेवाडी दबडेवस्ती ग्रामा 9 रु. 95.00 लक्ष, गळवेवाडी काळेलवस्ती ग्रामा 33 रु. 57.00 लक्ष, धावडवाडी ला जोडणारा ग्रामा 4 रु. 57.00 लक्ष, राजेवाडी पिलीव जिल्हा हद्द ग्रामा 98 रु. 142.50 लक्ष, आवळाई पिसेवाडी ग्रामा 14 रु. 47.50 लक्ष, शेटफळे रानमळा ग्रामा 161 रु. 47.50 लक्ष, करगणी शेटफळे चिंध्यापीर इजिमा 155 रु. 142.50 लक्ष, खरसुंडी बाळेवाडी करगणी इजिमा 151 रु. 57.50 लक्ष इतका निधी मंजूर झालेला आहे.
*विसापुर सर्कलसाठी* पेड धोंडेवाडी मोरदरा ग्रामा 160 रु. 47.50 लक्ष, हातनूर होनाई मंदीर ग्रामा 220 रु. 47.50 लक्ष, हातनूर तेलाचा मळा ग्रामा 59 रु. 47.50 लक्ष, मांजर्डे हायस्कूल रोड ते पत्रावस्ती ग्रामा 78 रु. 47.50 लक्ष, मांजर्डे गौरगांव तलाव ग्रामा 171 रु. 47.50 लक्ष इतका निधी मंजूर झालेला आहे.
खानापूर मतदारसंघातील रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरेसाहेब, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाणसाहेब, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणेमामा यांचे आभार व्यक्त केले.
मतदारसंघातील रस्ते सुसज्ज असले तर निश्चितपणे वाहतुक वाढून मतदारसंघाचा विकास होण्यास मदत होते. मतदारसंघात जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याचा प्रयत्न आहे. तसेच येत्या काही दिवसामध्ये मतदारसंघातील सर्वच रस्ते चांगले करण्यासाठी तसेच रस्त्यांच्या सुधारणा करण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आमदार अनिलभाऊ बाबर यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *