कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा जांभुळणी येथे प्रारंभ

.लोकदर्शन 👉 राहुल खरात

आटपाडी ;

श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, आटपाडी संचलित कला व विज्ञान महाविद्यालयाचे जांभुळणी, तालुका आटपाडी येथे विशेष श्रमसंस्कार शिबीराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे. सदरचे शिबिराचे उद्घाटन, जांभुळणीच्या सरपंच, मा. सौ. संगीता शिवराम मासाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी, प्राचार्य, डॉ. विजयकुमार पाटील हे उपस्थित होते. सदर शिबिरामध्ये दि.२१ ते २७ मार्च या कालावधीत श्रमदान, प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी ग्रामविकासासाठी राबवलेल्या कार्यक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन सरपंच सौ संगीताताई शिवराम मासाळ यांनी दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांच्याकडून ग्रामहिताच्या कामाची अपेक्षा व्यक्त केली. सायंकाळच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमात कु. वैशाली कांबळे व मा. अमोल मोरे, समूह समन्वयक यांनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. सात दिवस चालणाऱ्या या शिबिरात स्वयंसेवकाच्याकडून ग्रामस्वच्छता, परसबाग लागवड, शोष खड्डे व कंपोस्ट खत खड्डे खोदणे, वृक्षारोपण करणे, सर्वेक्षण, बांबू लागवड इत्यादी श्रमदान कार्यक्रम करण्यात येणार आहेत. आजच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमात सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, या विषयावर वैशाली कांबळे व अमोल मोरे यांनी अनमोल मार्गदर्शन केले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन अंकुश मुढे यांनी तर प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. साक्षी माने तर आभार कू. हिने केले. उद्घाटन समारंभाचे आभार कार्यक्रम अधिकारी, प्रा. भारती देशमुखे मॅडम यांनी व प्रास्ताविक, प्रा. नागेश चंदनशिवे, कार्यक्रम अधिकारी यांनी मानले.
या कार्यक्रमात वैशाली कांबळे, रविकिरण जावीर, सचिन लवटे, डॉ. त्रिशाला भोसले, डॉ. मीनाक्षी गुरव, आटपाडी तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ. साधना पवार, डॉ. विजय कुमार पाटील प्रा. बालाजी वाघमोडे, मा. शशिकांत शिंदे, आटपाडी विधितज्ञ, प्रा. संजय ठिगळे इत्यादी मान्यवरांचे मार्गदर्शन मिळणार आहे. सदर शिबिरामध्ये जांभूळणी येथील फ्रेंड सर्कल, फ्रेंड्स ग्रुप, नवतरुण गणेश मंडळ, जय भारत गणेश मंडळ, श्रीनाथ भजनी मंडळ, श्रीनाथ लेझीम मंडळ व जिल्हा परिषद मराठी शाळा याचा विशेष सहभाग असणार आहे. सदर शिबिरास प्रा. अभय जायभाये, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, प्रा. पोपट माळी, जिल्हा समन्वयक, सांगली, प्रा. तातोबा बदामे, विभागीय समन्वयक, तासगाव; मा. शिवाजीराव पाटील, सचिव, श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, आटपाडी; श्रीमती बाई माने, मा. तहसीलदार, आटपाडी व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, मा. मनोज भोसले हे मान्यवर भेट देणार आहेत. समारोप कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून, प्रा. संजय ठिगळे, माजी विद्यापीठ समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना, कोल्हापूर हे उपस्थित राहणार आहेत. शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना समिती, कार्यक्रम अधिकारी, प्रा. नागेश चंदनशिवे व प्रा. भारती देशमुखे; श्री शिवराम मासाळ, अध्यक्ष, बळीराजा फाउंडेशन, जांभुळणी; मा. गजानन पावले, सामाजिक कार्यकर्ते, जांभुळे यांच्या वतीने करण्यात आले आहे. सदर शिबिरात कला व विज्ञान महाविद्यालय,
आटपाडीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व स्वयंसेविका सहभागी झाले आहेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *