अतिदुर्गम भागातील जामगाव वासीयाच्या नशिबी अंधारच। ,,,,,,,,,,,,,,,, मूलभूत सुविधांची उणीव ; लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

 

लोकदर्शन  गडचांदूर,,,(प्रा, अशोक डोईफोडे)

– देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके लोटली. मात्र कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या जामगाव वासियांना आज ही मूलभूत सुविधा पासूनच वंचित राहावे लागत आहे.
मानिकगड पहाडाच्या पायथ्याशी असलेले, जामगाव हे जेमतेम पंचवीस ते तीस लोकवस्तीच आदिवासीबहुल गाव आहे. सदर गाव बेलगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट आहे. या गावाला जाण्यासाठी धड पक्का रस्ता ही नाही. दगड धोंडे व नाल्याच्या वाटेतून गावाला जावे लागते. रस्त्यात असलेल्या नाल्यावर पूल नसल्याने गावाचा पावसाळ्यात दरवर्षी संपर्क तुटतो. मात्र रस्ता व नाल्यावर पुलाची निर्मिती अद्यापही झाली नाही. तालुक्यातील गावागावात बऱ्याच सुविधा पोहचल्या असताना परंतु या गावात वीजही पोहोचली नाही. त्यामुळे त्यांना अंधारातच राहावे लागत आहे. मध्यंतरी सौर दिवे लावण्यात आले. तेही आज स्थितीत बंद अवस्थेतच आहे. दोन कूपनलिकेच्या भरोशावर संपूर्ण गावाची तहान भागवली जाते आहे. गावातील एकाही अंतर्गत रस्त्याचे साधे खडीकरण सुद्धा झाले नाही. शैक्षणिक व आरोग्य व्यवस्थेची तर मोठी उणीव दिसून येते. त्यामुळे या गावात किमान मूलभूत तरी सोयी सुविधा पुरवण्यात याव्या अशी अपेक्षा येथील ग्रामस्थ करीत आहे. मात्र त्यांना दरवर्षी आश्वासना पलीकडे काहीच मिळत नाही.प्रशासनाने आतातरी अमृत महोत्सवात या गावात मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here