किरीट सोमय्या यांच्यावरील हल्लेखोरांना त्वरीत अटक करावी- हंसराज अहीर                                       

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकार

भाजपा नेते, प्रदेश उपाध्यक्ष, पूर्व खासदार किरीटजी सोमय्या यांच्यावर पुणे येथील महानगरपालिकेत शिवसेना कार्यकत्र्यांनी नियोजित हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी तथा भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे.
लोकशाही प्रणीत व्यवस्थेत विचारांची लढाई विचारांनीच लढायची असते यात हिंसेला स्थान नसतांना हिंसेव्दारा विचार दडपण्याची कृती ही निषेधार्ह आहे. सोमय्या हे लोकशाही तत्वांचे पुरस्कर्ते असून कायद्यावर विश्वास असणारे नेते आहेत. अशा व्यक्तीला एकटे हेरून त्यांचेवर जीवघेणा हल्ला करण्याची कृती ही लज्जास्पद असून अशा प्रवृतीस व विचारधारेस लोकशाहीत अजिबात स्थान नसून जनता अशा कृतीला क्षमा करणार नाही. पोलिसांनी हल्लेखोरांचा त्वरीत शोध घेवून त्यांचेवर कारवाई करावी अशी मागणी श्री अहीर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here