स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त माँ साहेब गृह निर्माण संस्थेच्या वतीने हजारो लोकांना अन्नदान

लोकदर्शन 👉 मोहन भारती
सोलापूर दिनांक :- २३/०१/२०२२ :- शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती माँ साहेब गृह निर्माण संस्थेच्या वतीने कुंभारी येथे विविध सामाजिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.
दक्षिण सोलापूर कुंभारी येथे माँ साहेब गृह निर्माण संस्थेच्या वतीने घरकुल वसाहतीतील बाळासाहेब ठाकरे सभागृहातील स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. मिनाताई ठाकरे यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले विडी कामगार बंधु – भगिनींनी बाळासाहेबांचे जय जयकारचे घोषणा दिल्या नंतर कुंभारी येथील विडी कामगार वसाहतीतील हजारो कामगार व कुटुंबीयांना अन्नदान करण्यात आले . संपुर्ण माँ साहेब घरकुल वसाहत भगवेमय वातारण निर्माण झाले होते .
नन्ननविष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात श्रीनिवास चिलवेरी , पप्पु शेख , प्रशांत जक्का , नरेश अन्नलदास , यांच्या सह शेकडो विडी कामगार बंधु भगिनी उपस्थित होते .
===========================
फोटो मॅटर :- माँ साहेब घरकुल वसाहतीत स्व . बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरा करण्यात आला सदर प्रसंगी पुजन व अन्नदान करण्यात आले त्या वेळी विष्णु कारमपुरी ( महाराज ) व विडी कामगार बंधु भगिनी दिसत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here