

लोकदर्शन 👉 मोहन भारती।
………………………………………………..
*⭕मान्यवरांच्या हस्ते झाला गौरव*
………………………………………………
सप्तफेरे सामाजिक वधु- वर संस्थेच्या वतीने गेली अनेक वर्षा पासुन विविध सामाजिक क्षेत्रात अतिषय उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा आणि सामाजिक संस्थेचा गौरव करण्यात येतो.याही वर्षी एका कार्यक्रम हे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रधान करण्यात आले.या मध्ये नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणार्या आणि आदर्श काम करणाऱ्या “निश्चल पुरी फाउंडेशनचा” समाजरत्न पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाला आमदार अभिमन्यूजी पवार,आमदार विक्रमजी काळे,डाँ विठ्ठल लहाने,डाँ धर्मवीर भारती,नागनाथ गित्ते,पञकार संघाचे अध्यक्ष नरसिंग घोणे.सप्तफेरे संस्थेचे अध्यक्ष संजय राजुरे आदी मान्यवरांची यावेळी व्यासपिठावरती प्रमुख उपस्थिती होती.निश्चल पुरी फाउंडेशनचे सचिन तथा सामाजिक कार्यकर्ते अनिल पुरी यांनी हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला.हा पुरस्कार मिळाल्या बदल फाउंडेशनचे सर्व स्तरातुन अभिनंदन केले जात आहे.