राजुरा विधानसभेत तिन्ही नगर पंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व.

लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕आमदार सुभाष धोटेंच्या विकासकामांवर जनतेचे शिक्कामोर्तब.

⭕कोरपना – काँग्रेस – १२, भाजप – ४, शे. संघटना – १,
जिवती – काँग्रेस – ६, राष्ट्रवादी – ६, गोंगपा – ५,
गोंडपिपरी – काँग्रेस – ७, भाजप – ४, राष्ट्रवादी – २, शिवसेना – २,अपक्ष – २.

चंद्रपूर / राजुरा :– राजुरा विधानसभा क्षेत्रातील कोरपना, जिवती व गोंडपीपरी या नगर पंचायतीचे आज जाहीर झालेल्या निवडणुक निकालात क्षेत्रातील जनतेने लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या विकासशिल आणि दमदार नेतृत्वावर शिक्कामोर्तब करुन तिन्ही नगर पंचायतीवर काँग्रेस आणि काँग्रेस समर्थित आघाडीच्या उमेदवारांना झुकते माप देऊन दणदणीत विजयी केले आहे.
आज सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होऊन जसजसे निकाल जाहीर होत होते तस तसे शांत, संयमी, मनमिळाऊ, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या व काँग्रेस च्या जय जयकाराची पुकार जनतेच्या
अंतकरणातुन निनादु लागली. कोरपना नगरपंचायत निवडणुकीत आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्नाखाली कोरपना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे संचालक विजयराव बावणे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्यात आली येथे विजयराव बावणे यांनी नव्या-जुन्या कार्यकर्त्यांची सांगड घालत नितीन बावणे यांच्यावर कोरपना नगरपंचायत काँग्रेसची धुरा सोपविली. जनतेने येथे काँग्रेसला एकहाती सत्ता सोपवली आहे. एकूण १७ पैकी काँग्रेसने १२ जागा जिंकून निर्विवाद बहुमत प्राप्त केले आहे तर भाजपला ४ जागा राखता आल्या असून शेतकरी संघटनेला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. जिवती नगरपंचायत मध्ये एकूण १७ पैकी काँग्रेसला -६, राष्ट्रवादीला -६ असे एकुण १२ जागांवर विजय मिळाला असून येथे काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर गोंडवाना गणतंत्र पार्टीला ५ जागेवर विजय मिळाला आहे. गोंडपीपरी नगरपंचायतीमध्ये एकूण १७ जागा असून काँग्रेसला -७, भाजपा-४, सेना-२, राष्ट्रवादी-२, अपक्ष-२ असे पक्षीय बलाबल असून येथे जनते काँग्रेसाला सर्वात मोठा पक्षाची भूमिका सोपविली आहे. येथे मित्रपक्षांच्या सहकार्याने सत्तेवर आरूढ होण्याचे संकेत आमदार धोटे यांनी दिले आहेत. जिवती येथे भाजपची तर संपूर्ण मतदारसंघात तिन्ही नगर पंचायत निकालात शेतकरी संघटनेची मतदारांनी पुरती वाट लावली असल्याची तिखट प्रतिक्रिया जानकरांकडून व्यक्त होत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *