कामगार सेनेच्या वतीने चार हुतात्म्यांना आदरांजली

लोकदर्शन 👉 मोहन भारती

*सोलापूर दिनांक :- १२/०१/२०२२ :-* स्वातंत्र सेनानी व सोलापूरचे चार हुतात्मे स्वतंत्र वीर कुर्बान हुसेन , स्वातंत्रवीर श्रीकिसन सारडा , स्वातंत्रवीर मलप्पा धनशेट्टी , स्वातंत्रवीर जगन्नाथ शिंदे यांना महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली . यावेळी विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले कि , या चार हुतात्मांना भारतीय स्वातंत्र्य लढयात आपल्या प्राणाची आहुती देवून स्वातंत्र्य मिळवून दिले . आणि सोलापुरचे नाव सुवर्ण अक्षराने इतिहासात नोंद झाली . अशा थोर चार हुतात्मांना वंदन करून आदरांजली वाहीली .
सदर प्रसंगी विठ्ठल कुऱ्हाडकर , संजू शेट्टी , गुरुनाथ कोळी , रमेश चिलवेरी , आदि उपस्थित होते .
============================
*फोटो मॅटर- सोलापूरचे चार हुतात्मे स्वातंत्र्यवीर कुर्बान हुसैन , स्वातंत्र्यवीर श्रीकिसन सारडा , स्वातंत्र्य वीर मलप्पा धनशेट्टी , स्वातंत्र्यवीर जगन्नाथ शिंदे यांना आदरांजली वाहताना श्री विष्णु कारमपुरी ( महाराज ) , विठ्ठल कुऱ्हाडकर , संजु शेट्टी आदि पदाधिकारी उपस्थित होते.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here