गडचांदूर शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. — आमदार सुभाष धोटे.

लोकदर्शन 👉 मोहन भारती


⭕आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते गडचांदूर येथे ३ कोटी ४५ लक्षाच्या विकासकामांचे भूमिपूजन.

गडचांदूर :– गडचांदूर येथे वैशिष्ट्यपूर्ण अनुदान अंतर्गत २ कोटी १० लक्ष रुपये, अग्निशामन वाहनतळासाठी ८३ लक्ष, अग्निशमन सेवा केंद्राच्या इमारतीसाठी ५२ लक्ष अशा एकूण ३ कोटी ४५ लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, गडचांदूर शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता पडू देणार नाही. जय संताजी महिला मंडळ गड्चांदूर च्या वतीने संत जगनाडे महाराज चौक सौंदर्यीकरण व स्मारक उभारण्याकरिता १० लक्ष रुपये निधीची मागणी केली हा निधी लवकर उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. स्थानिक मानिकगढ गेट ते मोक्षधाम पर्यंत मुख्य रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याकरिता पाठपुरावा करून येथे निधी मंजूर करु, गडचांदूर बसस्थानकाकरिता अंबुजा सिमेंट कंपनीची जागा हस्तांतरित करण्यासाठी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे बैठक लावली असून तोही प्रश्न लवकरच मार्गी लागेल असा विश्वास व्यक्त केला. गड्चांदूर स्थित ऐरिगेशन विभागाची जागा नगर परिषदेस हस्तांतरित करण्यासाठीही आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी नगराध्यक्षा सविता टेकाम, कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव थिपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरुण निमजे, नगराध्यक्ष अरुण धोटे, बाळासाहेब मोहितकर, मुख्याधिकारी विशाखा शेडकी, उपनगराध्यक्ष शरद जोगी, गटनेते विक्रम येरणे, सभापती राहुल उमरे, अर्चनाताई वांढरे, कल्पना निमजे, नगरसेवक पापय्या पोनलवार, जयश्री ताकसांडे, अरविंद मेश्राम, मिनिक्षी ऐकरे, नामदेव येरणे, अशोक बावणे, उपसरपंच आशिष देरकर, सं गां नि योजनेचे अध्यक्ष उमेश राजूरकर, शैलेश लोखंडे, शहराध्यक्ष संतोष महाडोळे, महिला काँगेस अध्यक्ष अर्चना आंबेकर, अतुल गोरे, यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *