सावित्रीबाई चे कार्य दीपस्तंभासारखे मुख्याध्यापक– धर्मराज काळे। 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर …सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित; सावित्रीबाई फुले विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई ,पहिल्या महिला शिक्षीका सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले यांच्या 191 वी जयंती निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 3 जानेवारीला करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे यांनी सांगितले की, सावित्रीबाई यांचे कार्य हे दीपस्तंभासारखे आहेत या कार्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी व सामाजिक परिवर्तनाच्या लढाईत सामाजिक बांधिलकीचा वाटा उचलावा असे मनोगत व्यक्त केले.
सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले शाळेचे पर्यवेक्षक संजय गाडगे प्रमुख अतिथी म्हणून,उपस्थित होते .विद्या कांबळे ,ज्योती चटप नामदेव बावनकर, माधुरी उमरे, सुरेश पाटील ,सुषमा चवरे, राजेश वासेकर ,गजानन बोबडे उपस्थित होते .याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईच्या वेशभूषेत येऊन सावित्रीबाई च्या जीवनावर एक पात्री एकांकिका सादर केल्या. या अनुषंगाने घेण्यात आलेल्या भाषण स्पर्धा, गीत गायन स्पर्धा ,वेशभूषा स्पर्धा, हस्तकला स्पर्धा ,यामध्ये विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले ,राष्ट्रमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर ,यांच्या वेशभूषा साकारल्या हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक महेंद्रकुमार ताकसांडे यांनी तर आभार राजेश मांढरे यांनी मानले कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षिका तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *