भरधाव ट्रकने कामगारास चिरडले

लोकदर्शन 👉 मोहन भारती

⭕अवैध पार्किंग ने घडला अपघात

गडचांदूर :- कोरपना तालुक्यातील नांदाफाटा जवळील रामनगर येथे 2 जानेवारी रविवार रोजी सकाळी भरधाव ट्रकने सायकलस्वार कंत्राटी कामगाराला उडवले. या घटनेत गंभीर जखमीच्या उजव्या पायावरून ट्रक गेल्याने त्यांचा पाय कायमचा मोडला. यानंतर, संतप्त नागरिकांनी तब्बल चार तास वाहतूक अडवून ठेवली होती
गडचांदूर जवळील नांदा फाटा लगत असलेल्या रामनगर येथे ट्रकने सायकलस्वार कंत्राटी कामगाराला उडविले. यात गंभीर जखमी कामगाराला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी वाहतूक अडवली असून मागील ४ तासांपासून गडचांदूर – वानोजा राज्यमार्गावरील वाहतूक खोळंबली होती.मारोती गुलबाजी नवघडे ५५ वय वर्ष राहणार बिबी असे अपघातातील जखमीचे नाव आहे. ते अल्ट्राटेक कंपनी येथे आज रविवारी सकाळी कामास गेले होते.मात्र, आज त्यांची ड्युटी न लागल्याने ते सायकलने घरी परत होते. दरम्यान, बिबीलगत असलेल्या रामनगर येथे भरधाव मालवाहू ट्कने (एमएच ३४ एव्ही 2767 सीसीआर) धडक देत त्यांच्या उजव्या पायावरून गेली. या घटनेत मारोती गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना त्यांचा उजवा पाय कायमचा गमवावा लागला आहे. त्यांच्यावर चंद्रपूर येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तब्बल चार तासांनी मध्यस्थीने निघाला तोडगा

सदर जखमी व्यक्ती कुटुंबातील कमविता असल्याने त्यांचा उजवा पाय कायमचा गेल्याने भविष्यात उदरनिर्वाहाचा प्रश्न कुटुंबावर येण्याची शक्यता आहे जखमी मारोती नवगडे ला घटनास्थळी नगद घटनास्थळी नगदी रोख ५०,००० ( पन्नास हजार) व आणखी दोन महिन्यात ५०,००० (पन्नास हजार) व बारा महिने प्रतिमाह ८,००० (आठ हजार ) असा एकूण १,९६,००० रोख व उपचारार्थ संपूर्ण खर्च देण्यात येणार असल्याचे सीसीआर लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट कंपनीच्या पत्रावर लिखित देण्यात आले.

रोडलगतचे पार्किंग वाहन हटविण्याची मागणी

अंबुजाफाटा,गडचांदूर ते नांदाफाटा रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठी वाहने उभी असल्याने अशाप्रकारे अपघात घडत असल्याचे बोलले जात असून पोलीसांनी याकडे जातीने लक्ष देऊन रस्ता मोकळा करावा आन्यथा भाविष्यात मोठा जन आंदोलन उभारण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.आता पोलीस प्रशासन याकडे किती गंभीरतेने पाहतात हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

एसीएस या कंपनीचा सिमेंट बॅगने भरलेला एम एच ४० बी जी ३६८० या क्रमांकाचा मिनीट्रक रामनगर बीबी येथील गडचांदूर आवारपूर या राज्यमार्गावर अवैधपणे रस्त्यावरच उभा असल्याने अपघात झाल्याचे विश्वसनीय माहिती आहे गडचांदूर पोलिसांनी हा ट्रक जप्त केला असून या ट्रकचा चालक आकाश गवाले याचे कडे हेव्ही वाहन परवाना नसल्याचे बोलले जात आहे याचेवरही कठोर कारवाई होणे गरजेचे आहे

अल्ट्राटेक कंपनी मुळे याठिकाणी ट्रकांची मोठी वर्दळ असते अरुंद रस्ता त्यावर अनेकांचे अतिक्रमण आहे ग्रामपंचायतीचे नियोजन नसल्याने भाजीपाला चिकन मटण मार्केट रस्त्यावरच भरते यामुळे रस्ते अपघातात परिसरातील अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे बिबि , नांदाफाटा ते आवारपूर पर्यंतचा रस्त्याचे चौपदरीकरण होणे गरजेचे आहेत

अभय मुनोत नांदा

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *